आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काही सराफा दुकानदारांकडून बंदमध्ये दागिन्यांची छुपी विक्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमावस्येने तारले सराफांना, सांगण्यात आल्या स्वच्छतेची कामे सुरु असल्याच्या सबबी
सोलापूर- प्रस्तावित अबकारी कराला विरोध करत सराफ असोसिएशनने देशभर दुकाने बंद ठेवली आहेत. मात्र, सोलापुरात छुप्या पद्धतीने दागिन्यांची विक्री सुरू आहे. अर्ध्या शटरमधून साेन्याच्या दागिन्यांची विक्री सुरू असून ग्राहकांना मागील महिन्यातील २३ मार्चच्या पावत्या दिल्या जात अाहेत. या छुप्या विक्रीकडे लक्ष वेधले असता, असोसिशनने ते नाकारत बंद १०० टक्के असल्याचा दावा केला होता. मात्र, "दिव्य मराठी'ने केलेल्या पाहाणीत ही बाब उघडकीस आली आहे. अशा छुप्या व्यवहाराचे चित्रीकरण केले आहे. असोसिशनने बंद सांगितलेला असताना दुकाने सुरू असल्याबद्दल विचारले असता काही सराफांनी अरेरावीची भाषा केली.
केंद्रीय अर्थसंकल्पात दागिन्यांवर एक टक्का अबकारी कर लावल्याच्या निषेधार्थ सराफ सुवर्णकार यांचा गेल्या ३७ दिवसांपासून दुकान बंद सुरू आहे. काही दुकाने अमावस्येच्या नावाखाली सुरू ठेवून सफाई होत होती. तर काही दुकानांतून बिनधास्त सोने-चांदीची विक्री सुरु होती. "दिव्य मराठी'च्या चमूने बुधवारी दुपारी ४.४९ वाजता एका दुकानात जाऊन अर्धा ग्रॅम सोन्याचे मणी विकत घेतले. दुकानदाराने दुकानात प्रवेश दिला नाही. मात्र अर्ध्या उघड्या शटरमधून जाऊन सोन्याचे मणी आणून दिले आणि पैसे घेतले. पावती मागितली असता त्यांनी एप्रिलच्या तारखेची पावती देता येत नाही. बंद काळ सुरू आहे, असे सांगत त्याने २३ मार्चची पावती दिली. असोसिएशन आतातरी आपल्या आंदोलनात प्रामाणिकता आणेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अमावस्येची सफाई
-बँकेचे काम होते. उद्या अमावस्या असल्याने साफसफाई सुरू आहे. पंपाचे नियंत्रण कामकाजही दुकानातून चालते. त्यासाठी दुकान उघडले.” रेवणसिद्ध गिरीश चडचणकर, सराफदुकानदार
बंद काळात व्यवहार नाहीत

बंदकाळातकोणीही व्यवहार केले नाहीत. उद्या अमावस्या परवा पाडवा असल्याने स्वच्छतेचे काम सुरू असावीत. उद्या किंवा परवा दुकाने पूर्ववत सुरू करण्याचा विचार आहे.” गिरीश देवरमनी, अध्यक्षसराफ असोसिएशन