आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्यावरील उत्पादन शुल्क ग्राहकांकडूनच घ्यायचेय!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोने खरेदीवरील टक्का उत्पादन शुल्क सराफ व्यापाऱ्यांकडून घ्यायचे आहे. त्याची नोंदणी ऑनलाइनने करायची. वसुलीसाठी काेणीही अधिकारी व्यापाऱ्याच्या दुकानात जायचे नाही. एवढ्या सुकर पद्धतीने हा कर घेण्याच्या सूचना आहेत. परंतु व्यापाऱ्यांना हा करच नको आहे. त्यामुळेच त्यांचा बंद ताणला जातोय, असे केंद्रीय उत्पादन शुल्क खात्याचे सहायक आयुक्त जी. अार. देसाई म्हणाले. या करासंबंधी त्यांच्याशी केलेली बातचीत...

प्रश्न: सोने खरेदीवरील उत्पादन शुल्क जाचक अाहे, असे व्यापारी म्हणतात. आपले मत?
-हे पाहा, व्यापाऱ्यांनी या संदर्भात ऑनलाइन नोंदणी करायची आहे. हा कर व्यापाऱ्यांच्या उत्पन्नातील भाग नाही. तो ग्राहकाकडून घ्यायचा आहे. दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत भरायचा आहे. यासंबंधी पाहणीसाठी कुठलाच अधिकारी व्यापाऱ्याच्या पेढीत जाणार नाही. त्यामुळे ‘इन्स्पेक्टर राज’ची जी भीती सांगितली जाते, तेही नाही. त्यामुळे यात जाचक काय अाहे?
प्रश्न: सोन्यावर सरसकट हा कर भरावा लागेल काय?
-बिलकुल नाही. व्यापारी ज्याच्याकडे सोने देऊन दागिने बनवून घेतात, तिथे हा कर नाही. जिथे प्रत्यक्ष विक्री होते. त्याची रीतसर बिले दिली जातात. तिथेच या कराचा प्रश्न येतो. पुन्हा तोच मुद्दा हा कर काही व्यापाऱ्यांच्या उत्पन्नाचा भाग नाही. ग्राहकांकडूनच वसूल करायचा आणि शासनाकडे भरायचे. या बाबी व्यापाऱ्यांसमोर स्पष्ट करून सांगण्यात आल्या अाहेत.
प्रश्न: कर वसूल करण्यास सुरुवात झाली तर सोलापुरातून किती महसूल मिळेल?
-याचा काही अंदाज बांधलेला नाही. हा कर यापूर्वीही लागू करण्याचे प्रयत्न झाले होते. परंतु, व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे दोनदा माघार घ्यावी लागली. त्यामुळे व्यापाऱ्यांची संख्या, त्यांची उलाढाल यासंबंधी नेमकी आकडेवारी नाही. किती महसूल मिळेल याचा अंदाज नाही.

बऱ्याच बाबी सुटल्या
व्यापाऱ्याला त्रासहोणार नाही, अशा गोष्ट सांगितल्या जात आहेत. परंतु कायद्याची भाषा बऱ्याच जणांना कळत नाही. वसूलपात्र निकषांमध्ये काही गोष्टी लपलेल्या असतात, ज्या प्रत्यक्ष अंमलात उघड होतात. अशा बऱ्याच गोष्टींवर आम्ही शासनाशी चर्चा केली. त्यातून काही अडचणीच्या बाबी सुटल्या आहेत. सोमवारी याबाबत पुण्यात बैठक झाली. बंदवर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे.” गिरीश देवरमनी, अध्यक्ष,सोलापूर सराफ व्यापारी असोसिएशन