आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद: शासकीय कार्यालयांवर सौरऊर्जेतून वीजनिर्मिती; स्वयंपूर्णतेची नांदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आर. पी. कॉलेजचा यशस्वी प्रयोग - Divya Marathi
आर. पी. कॉलेजचा यशस्वी प्रयोग
उस्मानाबाद - जिल्हातील शासकीय कार्यालयांवर सौरऊर्जेतून वीजनिर्मितीसाठी १५ एप्रिलनंतर सौरयंत्रणा बसविण्यास सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सहा शहरांसाठी २६ लाख ६० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 
 
विजेच्या तुटवड्यावर कायमची मात करण्यासाठी एकात्मिक ऊर्जा विकास कार्यक्रमातून सौरऊर्जेला प्रोत्साहन देण्यात येत आहे. शहरात रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात सौर ऊर्जेतून दररोज युनिट ऊर्जेची निर्मिती होत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे विजेची मागणी सातत्याने वाढत आहे. परंतु पर्याप्त उपलब्धतेअभावी भारनियमनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागांमध्ये सुमारे तासांचे भारनियमन नित्याचे झाले झाले. यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी घालण्यासाठी वीज मिळत नसल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होते. नागरिकांना भारनियमनामुळे गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. 
 
यावर तोडग्यासाठी सककारसहित महावितरण सरसावले असून त्यांनी ठोस पावले टाकायला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ३८ शासकीय कार्यालयांवर सौरप्रणाली बसविण्याचा उपक्रम या प्रयत्नांचाच भाग आहे. राज्यात सुरू होणाऱ्या एकात्मिक ऊर्जा विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून महावितरणद्वारे यंत्रणेचे अद्ययावतीकरणासोबतच सौरऊर्जा उपक्रमाला चालना देण्यासाठी वेगळी तरतूद केली आहे. उस्मानाबाद, कळंब, उमरगा, तुळजापूर, नळदुर्ग मुरूम येथील ३८ शासकीय कार्यालयांवर सौरऊर्जा यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. कार्यालयीन कामकाजात सौरऊर्जेचा वापर वाढविण्यात येणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचे मुख्यालय असल्यामुळे येथे १४ कार्यालयांवर यंत्रणा बसविण्यात येणार आहे. तुळजापूरला चार, उमरगा, नळदुर्ग, मुरूम येथे प्रत्येकी पाच ठिकाणी शासकीय कार्यालयांवर यंत्रणा बसविण्यात येणार आहे. 
 
सौरऊर्जेसाठी जिल्हा अनुकूल :उस्मानाबाद जिल्हा सौरऊर्जेसाठी अनुकूल असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जिल्ह्यात वर्षातील सुमारे ३१७ दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश उपलब्ध असतो. यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात सौरऊर्जा प्रकल्प सुरू करण्यास वाव आहे. नैसर्गिक परिस्थितीचा फायदा घेऊन सौरऊर्जा निर्मिती करून वापर केल्यास जिल्हा विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊन शकतो. तसेच यातून आर्थिक उत्पन्नही होऊ शकते. 
 
अतिरिक्त वीज महावितरणला 
शासकीय कार्यालयात बसवलेल्या यंत्रणेतून निर्माण झालेली अतिरिक्त वीज महावितरण घेणार आहे. यासाठीही यंत्रणा उभी करण्यात आली आहे. यामध्ये वेगळी वीज वाहिनी बसवण्यात येईल. निर्माण झालेली अतिरिक्त वीज आपोआप महावितरणच्या यंत्रणेकडे साेपवली जाईल. याचे मोजमाप करण्यासाठी मीटर बसविण्यात येईल. 
 
चालना देण्यासाठी पुढाकार 
- जिल्ह्यात सौरऊर्जेस चालना देण्यासाठी महावितरण एकात्मिक ऊर्जा विकास कार्यक्रमातून विविध शासकीय कार्यालयांवर सौरउर्जा यंत्रणा उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात २६ लाख रुपयांची तरतूद आहे.
-सी.जे. दिघे, उपविभागीय अभियंता, उस्मानाबाद. 
 
यांना असेल प्राधान्य 
आर्थिक कारणाने अनेक कार्यालयांना वीज बिल भरणे शक्य होत नसल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित होतो. अशी कार्यालये, शासकीय वसतिगृहांवर सौरऊर्जा प्रणालीस प्राधान्य देण्यात येणार आहे. यामुळे नामुष्की टळेल.
 
उस्मानाबाद येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील मुख्य कार्यालय मुलींच्या वसतिगृहाच्या वर दोन सौरउर्जेचे युनिट बसवण्यात आले आहेत. यातून दररोज आठ युनिट विजेची निर्मिती होती. यामुळे महाविद्यालयाच्या वीज बिलामध्ये मोठी घट आली आहे. तसेच येथे निर्माण झालेली अतिरिक्त वीज महावितरणला विक्री होत आहे. येथील यंत्रणेला विंडव्हील बसविण्यात आले आहेत. यामुळे पवनऊर्जेतूनही वीजनिर्मिती होते. या यंत्रणेचा महाविद्यालयास फायदा झाल्याचे प्राचार्य डॉ. युवराज भोसले यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...