आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरकारी जलतरण तलाव डिसेंबरमध्ये नागरिक खेळाडूंसाठी उपलब्ध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - विजापूर होटगी रस्त्यावरील नागरिक जलतरणपटूंसाठी शासनाचा जलतरण तलाव डिसंेबर महिन्यात उपलब्ध होईल. जिल्हा जलतरण संघटनेने सुचवलेल्या सूचनासह याचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. तलावात पाणी भरणे त्याची चाचणी घेणे एवढेच काम शिल्लक राहिले आहे. डायव्हिंग बोर्डचीही ऑर्डर दिली आहे. ते आल्यानंतर तातडीने बसवण्यात येणार आहेत. त्यानंतर तलाव सुरू करण्याबाबत जिल्हा क्रीडा परिषदेच्या बैठकीत याचा अंतिम निर्णय होईल. हा तलाव कधी सुरू होईल याची माहिती घेतली असता जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांनी ही माहिती दिली. काम पूर्ण होण्यास पाच वर्षे लागले.
घटनाक्रम असा
दोनकोटी ६० लाख रुपयांचे अंदाजपत्रक, २०११ ला भूमिपूजन, पंढरपूरच्या सलीम कन्स्ट्रक्शनला काम दिले, दोन वर्षाची मुदत, सुरुवातीपासून पुण्याच्या सिंथेसिस डिझायन या वास्तुविशाद कंपनीची नियुक्ती, एक वर्षाची मुदत वाढ देऊनही काम पूर्ण झाल्यामुळे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ठेकेदारास लाख ६० हजारांचा दंड, त्याचवेळी खासगी वास्तुविशारदची नियुक्ती संपवून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे काम सोपविले, एप्रिल २०१६ मध्ये ३८ लाख ५० हजार रुपयांचा अतिरिक्त निधी दिला, आमदार सुभाष देशमुख यांनीही यासाठी निधी दिला, जिल्हा जलतरण संघटनेने डायव्हिंग बोर्डबाबत त्रुटी काढल्या, ऑगस्ट १६ मध्ये झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी या त्रुटी ठेकेदाराने स्वत:च्या निधीतून पूर्ण करून द्याव्यात असा निर्णय दिला. अखेर काम पूर्ण.

विजापूर रस्ता परिसरातील सरकारी जलतरण तलावाचे काम जिल्हा जलतरण संघटनेने सुचवलेल्या सूचनासह शंभर टक्के पूर्ण झाले आहे. किरकोळ गोष्टींवर शेवटचा हात फिरवण्यात येत आहे.
बातम्या आणखी आहेत...