आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटी अंमल सुरू, मात्र करमणूक कर कार्यालयास शासन आदेशाची प्रतीक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- देशभरात 1 जुलैपासून वस्तू सेवा कर अर्थातच जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाली. यामध्ये करमणूक कराचा समावेश असल्याने करमणूक कर शाखाच बंद होणार आहे. मात्र या कार्यालयात काम करीत असलेल्या २७ कर्मचाऱ्यांबाबत शासनाने अद्याप कोणताच निर्णय घेतला नाही. प्रशासनाने विभागीय आयुक्तांमार्फत याचा अहवाल शासनाकडे पाठविला असून तो शासनस्तरावरच अद्याप प्रलंबित आहेत. यामुळे आज कार्यालयांकडून दैनंदिन कामकाज सुरू आहे तर कर्मचाऱ्यांना शासन आदेशाची प्रतीक्षा आहे.
 
जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर शाखेच्या वतीने केबल, चित्रपटगृहे, व्हिडिओ गेम, ऑर्केस्ट्रा बार, व्हिडिओ सेंटर, जलक्रीडा, मनोरंजन, उद्यान, पूल पार्लर आदी १२ क्षेत्रांमधून करमणूक कर वसूल करण्याची जबाबदारी होती. करमणूक कराचा आता जीएसटीमध्ये समावेश झाल्याने या विभागातील कर्मचाऱ्यांवर कोणती जबाबदारी सोपविली जाणार याचा निर्णय झाला नाही. जिल्ह्यातून दरवर्षी १४ ते १६ कोटी रुपयांचा करमणूक कर वसूल केला जातो.
 
कार्यालयात२७ कर्मचारी...
करमणूकशाखेत एकूण २७ कर्मचारी असून यामध्ये एक तहसीलदार, नायब तहसीलदार, १९ अव्वल कारकून, तीन लिपीक, दोन शिपाई आणि एक वाहनचालक यांचा समावेश आहे. हे सर्व कर्मचारी पूर्णवेळ सेवेत आहेत. जीएसटीच्या पार्श्वभूमीवर या कर्मचाऱ्यांना सुरुवातीस सहा महिने, त्यानंतर चार महिने मुदत दिली होती. चार महिन्यांची मुदत जूनमध्ये संपली असून अद्यापपर्यंत या कर्मचाऱ्यांना मुदतवाढ दिली नाही.
 
दैनंदिन कामकाज सुरू
जीएसटी लागू होण्यापूर्वी करमूणक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना १० महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली, यामध्ये पहिल्या टप्प्यात तर दुस ऱ्या टप्प्यात महिन्यांचा समावेश आहे. मात्र ही मुदत जूनअखेर संपल्याने या कर्मचा ऱ्यांनी काय काम करायचे ? असा प्रश्न आहे. शासनाकडून कर्मचाऱ्यांना इतर शाखेकडे वर्ग करण्याबाबत अद्याप कोणतीच हालचाल नाही. हा विभागाचे काय होणार ? याची कोणतीच माहिती प्रशासनाकडे नाही. यामुळे आजही कार्यालयात दैनंदिन करमणूक कार्यालयाचे काम सुरू असल्याचे कार्यालयांकडून सांगण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...