आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात सप्टेंबरअखेर साडेतीन हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- जिल्हा अग्रणी बँकेच्या १० हजार कोटी रुपयांच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्यापैकी पीक कर्ज, मुदत कर्ज, इतर प्रकारचे कर्ज मिळून सप्टेंबर अखेर हजार ५३१ कोटी रुपये कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये खरीप पिकांना हजार ७०९ कोटी तर कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. यामध्ये १४ हजार ७०७ शेतकऱ्यांना ४२९ कोटी ४५ लाख रुपयांचे कर्ज सूक्ष्म सिंचनासाठी म्हणजे फक्त पिकांना ठिबक करण्यासाठी देण्यात आले आहे.
खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हजार ७०९ कोटी रुपयाचे कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील टंचाईसदृश परिस्थिती कमी पावसामुळे खरीप कर्जामध्ये अपेक्षित वाढ झाली नाही. परंतु ऑगस्ट, सप्टेंबरमधील पावसामुळे पीक कर्जात निश्चित वाढ होणे अपेक्षित आहे. मागील वर्षी सप्टेंबर २०१४ अखेर हजार ४२७ कोटी रुपये प्रत्यक्ष उद्दिष्ट साध्य झाले होते. चालू वर्षी सप्टेंबर अखेर हजार ५३१ कोटी रुपये कर्ज वितरण झाले आहे. मागील वर्षी कृषी क्षेत्रासाठी सप्टेंबर २०१४ पर्यंत हजार ७३६ कोटी रुपये कर्जाचे वितरण झाले होते, यंदा हा आकडा हजार १९५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील वर्षी पीक कर्जाचे ११५३ कोटी रुपये करण्यात आले होते, यंदा समाधानकारक पाऊस नसतानाही हजार ५९३ कोटी रुपये कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.
सूक्ष्म मध्यम लघुउद्योगांना मागील वर्षी सप्टेंबरअखेर ३६८ कोटी रुपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले होते, यंदा हाच आकडा ४८३ कोटींवर पोहोचला आहे.
िठबकसाठी ४२९ कोटी रुपयांचे कर्जे
शासनाच्याआदेशानुसार राष्ट्रीयीकृत जिल्हा बँकेकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ठिबकसाठी मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून दिले आहे. एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत ४२९ कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध केले आहे. यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांचा वाटा ४२५ कोटी, ग्रामीण बँकेचा वाटा कोटी ९४ लाख तर जिल्हा बँकेचा वाटा कोटी १७ लाख रुपयांचा आहे. मोटार पाइपलाइनसाठी हजार ७४७ जणांना १३३ कोटी ५७ लाख तर शेडनेट उभारणीसाठी हजार १९१ जणांना १३९ कोटी २१ लाख रुपयांचे कर्ज दिले आहे. उर्वरित सहा महिन्यांत बँकांना उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश दिल्याचे जिल्हाधिकारी मुंढे यांनी सांगितले.

मागील सहा महिन्यांतील कर्जाचे वाटप
जिल्ह्यातीलराष्ट्रीय, ग्रामीण जिल्हा बँकेला १० हजार कोटी रुपयांचा पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला होता. शैक्षणिक कर्ज म्हणून हजार ८६३ जणांना १९ कोटी ४५ लाख, गृहकर्ज म्हणून हजार १७६ जणांना ९५ कोटी २४ लाख तर इतर कर्ज म्हणून हजार ३६२ जणांना १७४ कोटी ३१ लाख रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...