आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्याच पेपरला ५८९ विद्यार्थी गैरहजर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- बारावीच्या बोर्ड परीक्षेला शुक्रवारी (दि.१८) प्रारंभ झाला असून इंग्रजीच्या पहिल्याच पेपरला जिल्ह्यातील विविध केंद्रावर ५८९ विद्यार्थी गैरहजर राहिले आहे. यातून बारावीच्या परीक्षेतील गळतीचे प्रमाणही वाढत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील ४१८ माध्यमिक शाळांतील बारावीच्या १४ हजार ४०८ विद्यार्थ्यांनी परीक्षेचे पात्रता फॉर्म भरले होते.

२०१५-१६ या शैक्षणिक वर्षातील बारावीची परीक्षा सुरू झाली असून जिल्ह्यातील ३७ केंद्रावर परीक्षा घेण्यात येत आहे. शुक्रवारी इंग्रजीचा पहिला पेपर झाला असून १३ हजार ८१९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. शिक्षण विभागाच्या वतीने बारावीची परीक्षा शांततेत पार पाडण्यासाठी केंद्रनिहाय बैठे पथक नियुक्त केले आहे. तसेच फिरते पथक नियुक्त केले असून पथकात तहसीलदार, नायब तहसीलदार दरज्याचे पाच अधिकारी आहेत. कॉपीमुक्तीबरोबरच बारावीची परीक्षा शांततेत पार पाडण्यासाठी पथकातील अधिकारी प्रयत्न करत असून पहिला इंग्रजी विषयाचा पेपर शांततेत पार पडला आहे. जिल्ह्यातील जवळपास ४१८ माध्यमिक शाळेतील १४ हजार ४०८ विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यासाठी पात्रता फॉर्म भरले होते. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे तसेच स्थलांतरामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देता येत नसल्यामुळे यंदा बारावीच्या परीक्षेतील गळती वाढली आहे. गतवर्षी बारावीच्या इंग्रजी विषयाच्या परीक्षेत जवळपास ३५० विद्यार्थी गैरहजर होते. यंदा बारावीच्या परीक्षेतील इंग्रजी विषयाच्या परीक्षेतील गळतीचे प्रमाण दुपटीने वाढले असून ५८९ वर गेले आहे. ही परिस्थिती सततच्या दुष्काळामुळे निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन : परीक्षेसंदर्भातयेणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विभागीय मंडळस्तरावर दहावीसाठी ०२३८२- २५१७३३ बारावीसाठी ०२३८२-२५१६३३ या हेल्पलाइन सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यासाठी समुपदेशक म्हणून के. बी. पवार (९४२१३६१५४३), एस. जे. चंदनशिवे (९५२७२९६६०५) या क्रमांकावर संबंधितांनी सपंर्क साधावा, असेही विभागीय सचिव, लातूर यांनी पाठविलेल्या पत्रामध्ये नमूद केले आहे. याचा पालकांसह विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन परीक्षा मंडळाच्या वतीने करण्यात आले अाहे.

सहा फिरते पथक
यंदाच्याशैक्षणिकवर्षातील बारावीच्या परीक्षेला प्रारंभ झाला असून शुक्रवारी इंग्रजी विषयाचा पेपर शांततेत पार पडला आहे. विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त पेपर सोडवून शिक्षण विभागाला सहकार्य करण्याची गरज आहे. केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी ३७ बैठे फिरते पथक नियुक्त केले आहे. -औदुंबर उकिरडे, माध्यमिकशिक्षणाधिकारी.