आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: पोलिसांनी केला बंदोबस्ताचा प्रचंड बाऊ, नागरिकांना, कार्यकर्त्यांना झाला मन:स्ताप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रामवाडी गोदाम परिसरातील उत्साही कार्यकर्त्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. - Divya Marathi
रामवाडी गोदाम परिसरातील उत्साही कार्यकर्त्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.
सोलापूर - मोदी पोलिस चौकी, रेल्वे पूल, रामवाडी गोदाम गेट, मतमोजणी ठिकाणी पोलिसांनी सुरक्षेचा बाऊ केल्याने अनेकांना मन:स्ताप झाला. कार्यकर्त्यांना विजयाचा अानंद घेण्यासाठी पोलिसांनी जणू मनाईच केली होती. पोलिस बंदोबस्ताचा हा अतिरेक म्हणावा लागेल. 
तिन्ही ठिकाणी नागरिकांना निकालाची माहिती देण्याासाठी ध्वनिक्षेपकाची सोय नव्हती. गेल्यावेळी अशी सोय होती. रामवाडी गोदामात जाताना मोबाइलला बंदी होती. चार ठिकाणी तपासणीला सामोरे जावे लागत होते. रेल्वे पुलाजवळून उमेदवार मतमोजणी प्रतिनिधी यांनाच प्रवेश होता. पोलिस उपायुक्त नामदेव चव्हाण हे गोदामासमोर थांबून नागरिकांना ध्वनिक्षेपकावरून सूचना देत होते. रेल्वे पुलाजवळच वाहतूक अडवली होती. मोदी चौकीजवळ कमांडो पथक दुचाकीस्वारांना, गोंधळ घालणाऱ्या तरुणांना लाठी चालवून हटवत होते. दुचाकी वाहने ताब्यात घेतली जात होती. 

कडेकोट बंदोबस्त 
संवेदनशील भागात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. शिवाजी चौकात गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील, पत्रा तालीमजवळ सहायक पोलिस निरीक्षक रमेश चिंताकिंती, थोरला मंगळवेढा तालीमजवळ एसीपी शर्मिष्ठा घारगे त्यांच्या पथकाचा बंदोबस्त होता. नवीवेस चौकीजवळ थांबून डीसीपी अपर्णा गीते घडामोडींवर लक्ष ठेवून होत्या. पंजाब तालीम, पाणीवेस, दत्त चौक, सोन्या मारुती, शेळगी, विजापूर वेस, नई जिंदगी, अमन चौक, अासरा चौक, बाळे भागातही मोठा बंदोबस्त फिक्स पाॅइंट होते. 

मात्र नेटके नियोजन 
मतमोजणी ठिकाणी जागोजागी बॅरिकेडिंग लावून वाहने अडवण्यात अाली होती. शहरात जागोजागी, संवेदनशील ठिकाणी वाढीव बंदोबस्त होता. पोलिस अायुक्त रवींद्र सेनगावकर प्रत्येक घटनांवर लक्ष ठेवून होते. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचे नेटके नियोजन होते. 

दुचाकी रॅलीला पोलिसांकडून ‘ब्रेक’ 
दुचाकी रॅली अथवा ट्रीपल सिट जाणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले. शिवाजी चौकात जल्लोष करीत जाणाऱ्या काही कार्यकर्त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी अटकाव केला. सौम्य लाठीमारही केला. नई जिंदगीत हारून सय्यद तौफिक शेख या गटात निवडणुकीत गोंधळ झाल्यामुळे अाज वाढीव बंदोबस्त होता. 
 
बातम्या आणखी आहेत...