आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवतांच्या भग्न मूर्ती, फोटाे यांच्या व्यवस्थेसाठी ‘वाय फोर डी’चा पुढाकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- घरात भग्न झालेल्या देवतांच्या मूर्ती, फुटलेले फोटो आपण सरळ नेऊन कोणत्यातरी देवळात किंवा त्या त्या धार्मिक स्थळात ठेवतो. परंतु यामुळे घर तर स्वच्छ दिसते पण आपलेच मंदिर, मशीद किंवा अन्य धार्मिक स्थळे विद्रूप दिसतात. यासाठी शहरातील वाय फोर डी या संस्थेने पुढाकार घेत, या मूर्ती आणि फोटो संकलित करून प्रदूषण करता त्यांची विल्हेवाट लावण्याचे एक विलक्षण कार्य हाती घेतले. असे फोटो किंवा मूर्ती टाकता स्वतःच त्याची विल्हेवाट लावावी, असा संदेशही ते देत आहेत. 

वाय फोर डी म्हणजे यूथ फॉर डेव्हलपमेंट या संस्थेच्या जवळपास ५० जणांनी हा नवा वसा हाती घेतला असून याद्वारे ते शहरातील धार्मिक स्थळात होणारे विद्रूपीकरण थांबवण्याचे कार्य करत आहेत. ठेवण्यात आलेल्या देवतांच्या फोटो फ्रेम संकलित करून त्यांच्यातील फोटो बाहेर काढले जातात. राहिलेल्या फ्रेम्स जाळून टाकण्यात येतात. देवतांचे फोटो त्यांच्याशी जोडलेल्या भावनांचा आदर राखत, त्यांचे विधिवत पूजन होत, त्यांचे अग्नी विसर्जन केले जाते. 

हा आहे अभिनव प्रयोग 
पीओपीच्यामूर्ती पाण्यात टाकल्याने जलप्रदूषण होते. यावर एक अजब उपाय शोधत त्यांनी या मूर्तींवर अमोनियम बाय-कार्बोनेट टाकून त्यांना वितळवण्यात येत, तो लगदा झाडांना टाकला तर त्याचे खत होते. डॉ. उमांकात चनशेट्टी यांनी सिद्ध करून दाखविले आहे. तोच प्रयोग सोलापुरातही करीत आहोत. 

घरातील भंगलेले देवांचे फोटो किंवा मूर्ती रस्त्यावर किंवा धर्मिकस्थळात ठेवू नयेत. यामुळे शहर विद्रूप दिसते. पाण्यात विसर्जित केल्याने प्रदूषण होते.
- प्रा.हिंदूराव गोरे, सदस्य 

यांचा होता सहभाग 
संस्थेचे अध्यक्ष अनिकेत चनशेट्टी, प्रा. गजानन धरणे, प्रा. हिंदूराव गोरे, प्रतीक भडकुंबे, सिद्धार्थ माढेकर, सतीश आळंद, नेहा भोसले, प्रज्ञा पाटील, स्नेहा सिंदगी आदी ४० जणांचा संघ. 
बातम्या आणखी आहेत...