आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हेंडिंग मशीनवर 20 रुपयांमध्ये एप्रिलपासून मिळणार 'सात-बारा'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - भूमी अभिलेख विभागाचे डिजिटलायझेशन सुरू अाहे. ऑनलाइन सात-बारा सुविधेनंतर अाता जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतूमध्ये व्हेंडिंग मशीनद्वारे मागणी करताच २० रुपयांत सात-बारा उतारा मिळण्याची सुविधा एप्रिलपासून सुरू होत आहे. यापूर्वी नागपूर येथे हे मशीन कार्यान्वित झाले असून सोलापुरात दुसरे मशीन असेल.

ऑनलाइन सात-बारा उतारा देण्यातील त्रुटी कमी करण्यात प्रशासनास यश आले आहे. याचा पुढील टप्पा म्हणून जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी सात-बारा व्हेंडिंग मशीन बसवणार आहे. यासाठी तीन कंपन्यांकडून कोटेशन मागवण्यात आले आहेत. यामध्ये फोर्ब्स कंपनीच्या कोटेशनचा विचार करण्यात येणार आहे. २ लाख ७० हजार रुपये मशीनची किंमत असून सात-बारा उतारा काढण्याबाबतचा डेमो पाहून निर्णय घेण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी रेळेकर यांनी सांगितले. तलाठी वा सेतू कार्यालयांतून सात-बारा उतारा मिळण्याची सुविधा सध्या आहेच. मात्र ही यंत्रणा २४ तास उपलब्ध राहत नाही. सुटीच्या दिवशी उतारे मिळण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागते. सात-बारा व्हेंडिंंग मशीन कार्यान्वित झाल्यास या अडचणी दूर होतील. २० रुपये मशीनमध्ये जमा केल्यानंतर सातबारा गट नंबर िफड करताच उतारा मिळणार आहे. हे मशीन महाभूमी अभिलेख या संकेतस्थळाशी जोडलेले असणार आहे. यावरून हा उतारा उपलब्ध होईल. एटीएम मशीनमधून पैसे काढताना ज्या पद्धती आहेत, तशा प्रकारेच मशीनमधून उताऱ्याची छायांकित प्रत उपलब्ध होणार आहे.
 
- सात-बारा उतारा मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सात-बारा व्हेंडिंग मशीन बसविण्यात येणार आहे. याबाबत कोटेशन मागवण्यात आले आहे. १ एप्रिलपासून व्हेंडिंग मशीनमधून उतारे देण्याचा प्रयत्न असणार आहे. यासाठी २० रुपये मशीनमध्ये भरावे लागतील, त्यानंतर मशीनमधूनच सात -बारा उतारा मिळणार आहे.  
अजित रेळेकर, निवासी उपजिल्हाधिकारी
बातम्या आणखी आहेत...