सोलापूर- इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने कारीगर पेट्रोल पंपाच्या लीज भाड्यापोटी कोटी ३३ लाख ८९ हजार रुपये भरल्याने कारीगर पेट्रोल पंप सील करण्यात आले होते. मात्र कंपनीने यापैकी २० लाख रुपये भरून उर्वरित रक्कम तीन महिन्यात भरण्याच्या अटीवर सील उघडण्याचे आदेश जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी तहसीलदारांना दिले.
तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी भाड्याची रक्कम भरल्याने १२ एप्रिल रोजी सील केले होते. कंपनीने इंडियन ऑईल कंपनी ही भारत सरकारच्या अंगीकृत असून संचालक मंडळाच्या मान्यतेशिवाय भाडे भरता येत नसल्याचे म्हणणे मांडले होते. जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी कंपनीचे म्हणणे ऐकून महिने मुदतीत भाड्याची रक्कम जमा करा या अटीवर सील उघडण्यास परवानगी दिल्याचे आदेशामध्ये नमूद केले आहे.
दोन महिने पंप राहिला बंद...
१२एप्रिल रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी मुंढे यांच्या आदेशानुसार पंप सील करण्यात आले होते. ६० दिवसांनंतर जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी कंपनीचे म्हणणे ऐकून सील उघडण्यात आले. १९६० ते २०१६ या कालावधीतील आकारणी भोगवटा याचे कोटी ३३ लाख ८९ हजार थकीत असल्याने पंप सील केले होते.