आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसुंधरा महोत्सवाला पाटेकर, अनासपुरे; आठवड्यात दिग्गज येणार सोलापुरात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - नववा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १६ ते १९ आॅगस्ट या कालावधीत सोलापुरात होत असून, या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध सिनेअभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे येणार असल्याची माहिती किर्लोस्कर फेरसचे हृषीकेश कुलकर्णी यांनी दिली. 
 
या महोत्सवाचे उद्घाटन १६ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता फडकुले सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन नाना पाटेकर मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते होणार आहे. वसुंधरा मित्र पुरस्कार प्रदान करण्यात येईल, नाम फाउंडेशनचा लघुपट दाखवण्यात येईल. १७ आॅगस्ट रोजी सकाळी सात वाजता दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंगकुडल येथे वाॅक फाॅर रिव्हर होईल. १८ आॅगस्ट रोजी संगमेश्वर काॅलेज येथे सकाळी वाजता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण प्रश्नमंजूषा स्पर्धा होईल. ९.३० वाजता व्हीव्हीपी इंजिनिअरिंग काॅलेज येथे अल्टरनेट टू सॅन्ड सादरीकरण होईल.१९ आॅगस्ट रोजी विविध महाविद्यालयांत पथनाट्ये. सकाळी १०.३० वाजता डब्ल्यूआयटी इंजिनिअरिंग येथे ग्रीन इनिशिएटिव्ह पर्यावरणपूरक कारखाना सादरीकरण करण्यात येईल. सायंकाळी साडेपाच वाजता फडकुले सभागृहात डाॅ. बी. बी. ठोंबरे यांचा विशेष सन्मान होणार आहे. सेव्ह रिव्हर, सेव्ह लाइफ हा महोत्सवाचा विषय आहे. विनामूल्य प्रवेशिका मिळवण्यासाठी किर्लोस्कर फेरस (शिवशाही) येथे सकाळी १० ते या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. 
बातम्या आणखी आहेत...