आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध गॅस पकडतात, एजन्सींवर पोलिस का नाहीत करत कारवाई?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - वर्षानुवर्षे पोलिसांकडून घरगुती वापराचा गॅस व्यावसायिक कारणासाठी वापरल्याचे अाढळून अाल्यास जप्त करण्याची कामगिरी होते. पण पुढे ते सिलिंडर वारंवार कोठून येतात? याचा छडा मात्र लावला जात नाही. हे गॅस थेट कंपनीतून येतात की, गॅस वितरकांकडून येतात की, ग्राहकच घरगुती घेऊन व्यावसायिक वापर करतात, हे शोधून काढणे अावश्यक अाहे. कुंभारी विडी घरकुल येथे अवैध गॅस भरणा केंद्रावर छापा टाकून २४ गॅस सिलिंडरसह ९८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच दोघांना ताब्यात घेतले. 
 
गोपनीय माहिती मिळताच पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी आदेश देऊन विशेष टीममार्फत ही कारवाई करायला लावली. ही कारवाई शनिवारी सकाळी च्या सुमारास कुंभारी येथील गोदुताई विडी घरकुल विभागातील ५२४-२ रुममध्ये अवैध गॅस भरणा केंद्र सुरू होता. 

पोलिसांनी या कारवाईत फैजल अशपाक करणकोट (रा. कुंभारी विडी घरकुल) याच्याकडून पूर्ण भरलेले १४ रिकामे १० असे एकूण २४ गॅस सिलिंडर जप्त केले. याच्यासोबत इलेक्ट्रिक मोटार, इलेक्ट्रिक वजनकाटा असा एकूण ९८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये एक गॅस सिलिंडर एचपी आणि उर्वरित गॅस सिलिंडर इण्डेन कंपनीच्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 
अवैध गॅस भरणा केंद्राच्या मालकाचे नाव राजू महिबूब नदाफ असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला. ही कारवाई अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष टीममधील सहायक पोलिस निरीक्षक संदीप धांडे, अमृत खेडकर, अंकुश मोरे, पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, अमोल माने, सुरेश लामजने, पांडुरंग केंद्रे, दिनेश राठोड, बालाजी नागरगोजे, महादेव लोंढे यांच्या टीमने ही कारवाई केली. 

हे प्रश्न अनुत्तरीतच... 
अनेक ठिकाणी शहर असो किंवा ग्रामीण परिसर अवैध गॅस भरणा केंद्रावर पोलिस आणि पुरवठा विभागाची अनेकवेळा कारवाई झाली. या गॅसभरणा केंद्रावर छापा टाकून येथील साहित्य जप्त केले जातात आणि एकाद दुसऱ्या व्यक्तीस अटक केली जाते. मात्र हे गॅस सिलिंडर कोठून आले, कोण दिले, याबाबत पोलिस कारवाई करत नाहीत. गॅस सिलिंडरवरील कोड नंबर वरून ते कुठल्या डिलरचे आहेत हे एका क्षणात लक्षात येते. या माहितीवरून त्या डिलरवर कारवाई करणे अपेक्षित असताना अद्याप एकाही गॅस सिलिंडर डिलरवर किंवा अशा प्रकारे घरगुती गॅस व्यवसायिक वापर करणाऱ्यावर कारवाई झाली नाही. या प्रश्नाचे उत्तर पोलिस आणि पुरवठा विभागाच्या गुलदस्त्यात आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...