आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलयुक्त शिवार कामांचे फोटो अपलोड करणे बंधनकारकच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जलयुक्त शिवार योजनेंतर्गत राज्य शासनाने दिलेल्या संकेतस्थळावर फोटो अपलोड करणे बंधनकारकच आहे. पेपर कितीही चांगला लिहिला. पण रोल नंबरच टाकला नसेल तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. यामुळे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कामांची संख्या सर्वाधिक असली तरी ते काम शासनापर्यंत पोहोचले पाहिजे. यासाठी प्रत्येकांनी फोटो अपलोड करणे बंधनकारक आहे. याबाबत आढावा घेऊन संबंधितांना वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सांगितले. 
 
महसूल भवनचे बांधकाम गेली आठ वर्षे सुरू आहे, अद्याप पूर्ण झाले नाही. यावर जिल्हाधिकारी भोसले म्हणाले, फक्त फर्निचरचे काम शिल्लक आहे. यासाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत निधी देण्याबाबत निर्णय होणार आहे. मात्र येत्या तीन महिन्यांत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. फर्निचरच्या कामांमध्ये काही बदल सुचवण्यात आल्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी स्पष्ट केले. 

जिल्ह्यात१६ महामार्ग 
दोनपालखी मार्गासह जिल्ह्यात १६ पालखी मार्ग मंजूर आहेत. या महामार्गांसाठी लागणाऱ्या जमिनींचे प्रस्ताव संबंधित विभागांकडून आले नाहीत, येत्या तीन महिन्यांत हे प्रस्ताव प्राप्त होतील. त्यानंतर एका वर्षभरात संपादन प्रक्रिया पूर्ण करून ताबा देण्यात येणार आहे. महामार्गाचे काम पूर्ण करण्यास प्राधान्य असून, यामध्ये दोन्ही पालखी मार्ग सुरू होतील, अशी अपेक्षा असल्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भेसले यांनी सांगितले. 

वक्फ बोर्डाच्या जमिनी नोंदीबाबत सूचना देऊ 
वक्फबोर्डाच्या जमिनीच्या नोंदी घेण्याबाबत शासनाने आदेश दिल्या आहेत. मात्र त्या जमिनी मूळ कोणाच्या आहेत, याचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. वक्फ बोर्डाच्या जमिनी नोंदी घेण्यासाठी संबंधित अधिकारी यांची बैठक घेण्यात येणार आहे. मात्र सत्ता प्रकार नोंद करताना काही गोष्टी महत्त्वाच्या असून, त्यानुसार व्यक्तिगत नोंदी वगळण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील प्रकरणांचा आढावा घेऊन नवीन नोंद घेण्याबाबत सूचना देणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले. 
 
बातम्या आणखी आहेत...