आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदू कोड बिल हे ख्रिश्चन, मुस्लिम, पारशींना लागू नाही, शरदराव ढोले यांची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत ख्रिश्चन, मुस्लिम आणि पारशी यांना हिंदू कोड बिल लागू नाही, असा उल्लेख केला अाहे. कारण जो धारण केला जातो तो धर्म होय. इतर उल्लेख केलेले धर्म नाहीत असे विधान व्याख्याते शरदराव ढोले यांनी काढले. सोलापूर जनता बँक आयोजित गणेशोत्सव व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते.

हुतात्मा स्मृती मंदिर येथे बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाच्या व्याख्यानात बोलत होते. भारतातील धार्मिक लोकसंख्या बदलाची कारणे, परिणाम उपाय या विषयावर त्यांनी पुष्प गुंफले.

ते म्हणाले, विचार त्यामागचे तत्त्वज्ञान महत्त्वाचे असते. कारण विचारात ताकद असते. मुस्लिम जनन-दर ५.४ तर हिंदू जनन दर २.४ आहे. लोकसंख्या वाढ ही कायद्याशी निगडित नसून समाज भूमिकेशी निगडित आहे. जनन आणि जनसंख्या ही दोन शास्त्रे आहेत. यास डेमोग्राफी असे म्हटले जाते. प्रजनन दर याचा अर्थ एक महिला किती बालकांना जन्म देते हे होय. शिवाय तो स्त्रियांशी निगडित आहे. म्हणजे एका ठरावीक काळात अपत्ये जन्माला येणे त्याच काळात होणारे मृत्यू. आजवर केवळ हिंदू म्हणून अशी वेगळी जनगणना झाली नाही. ती सर्वसामन्यपणे हिंदू, बौद्ध, मुस्लिम, पारशी अशी झाली.

सर्वात पहिली जनगणना १८७२ मध्ये झाली तरी ती १८८१ मध्ये जाहीर केल्याने १८८१ हीच पहिली जनगणना असे संबोधले जाते. शेवटची जनगणना २०११ ला झाली आहे. या एकूण १३० वर्षांच्या १३ जनगणनेचे दोन भाग पडतात. १९४७ मध्ये झालेली फाळणी त्यामुळे १८८१ ते १९४१ १९५१ ते २०११ असे याचे दोन भाग. यात असे दिसून येते की, हिंदू एक प्रतिशत कमी होतोय, तर मुस्लिम समाज एक प्रतिशत ने वाढतोय. प्रारंभी उत्सव मंडळाचे अडग्याप्पा कडगंची, अशोक सरवदे यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन झाले.

हिंदू संघटन, एकत्रीकरण महत्वाचे
मुस्लीमसमाजाची वाढती संख्या लक्षात घेता अवघ्या ३६० वर्षांत हिंदुस्थानातून हिंदू संपेल, अशी भिती कर्नल मुखर्जी यांनी व्यक्त केली होती. १९२५ साली डॉ. हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. तसेच स्वातंत्र्यपूर्व काळात गांधी हे हिंदूंचे, बॅरिस्टर जीना हे मुस्लिमांचे तर डॉ. आंबेडकर हे बहुजनांचे नेते असे चित्र होते. तसेच १९२५ साली देशात साडेसहा लाख गावे असून केवळ हजार गावात संघाच्या शाखा होत्या. आज हिंदुस्थान टिकवायचा असेल तर हिंदूंचे संघटन एकत्रीकरण महत्वाचे आहे, असे ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...