आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय कार्यालयांतील तक्रारपेट्या झाल्या गायब, शासनाचे आदेश असतानाही अंमलबजावणी नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कळंब-शासकीयकार्यालयाच्या बाहेर तक्रारपेटी लावण्यासंदर्भात शासनाचे आदेश असतानाही शहरातील बहुतांश कार्यालयांत तक्रारपेट्या लावण्यात आलेल्या नाहीत. तर काही ठिकाणी तक्रारपेट्या आहेत परंतु, त्यांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे गुपीत तक्रार करण्यावर नागरिकांना अडचण येत आहे.

विविध शासकीय कार्यालयांत नागरिकांची कामे वेळेत होत नाहीत चिरीमिरी घेतल्याशिवाय संचिका पुढे सरकत नाहीत. शासकीय कार्यालयांतील या कारभारामुळे सामान्य नागरिक त्रस्त झालेले आहेत. नागरिक तक्रार करण्यासाठी संबंधित कार्यालयात गेल्यावर तेथे अधिकारी उपलब्ध होत नाहीत. इतर कर्मचारी तक्रार स्वीकारण्यास तयार नसतात. तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्न वारंवार नागरिकांना पडतो. तसेच बऱ्याचवेळा गंभीर प्रकाराची तक्रार करण्यासाठी गेल्यावर संबंधित अधिकारी त्या तक्रारदारावर दबाव आणून तक्रार करू देत नाहीत. त्यामुळे तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्न वारंवार नागरिकांना पडत आहे. शासनाने संबंधित कार्यालयासमोर तक्रार पेटी ठेवण्याच्या सूचना केलेल्या आहेत. मात्र संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना याचे गांभीर्य नसल्यामुळे तक्रारपेट्या काढून टाकलेल्या आहेत.

चौकशीची गरज
शासनाकडूनआदेश असतानाही तक्रार पेट्या लावणाऱ्या असणाऱ्या तक्रार पेट्या गायब केल्याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

अधिकारीच उदासीन
शासनाचेआदेश असताना सुध्दा संबंधित कार्यालयातील अधिकारी तक्रारपेटीबाबत उदासीन असून याच अधिकाऱ्यांना तक्रारी होऊ नयेत, असे वाटत आहे का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. याप्रकरणी वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.

^शासकीय कार्यालयात कुठल्याही प्रकारची कामे लवकर होत नाहीत. त्यामुळे नागरिकांना वारंवार संबंधित अधिकाऱ्यांची तक्रार करायची असेल तर शासकीय कार्यालयात तक्रारपेट्या नाहीत. त्यामुळे तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्न पडत आहे.'' नितीनघोंगडे, नागरिक.

येथे नाहीत तक्रारपेट्या
तहसीलकार्यालय, पोलिस ठाणे, भूमीअभिलेख कार्यालय, नगरपालिका, तालुका आरोग्य कार्यालय, गटशिक्षण कार्यालय, महिला बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, सामाजिक वनीकरण विभाग, दुय्यम निबंधक कार्यालय, सहाय्यक निबंधक आदी कार्यालयांत तक्रारपेट्या उपलब्ध नाहीत.

पंचायतसमितीत गैरसोय
येथीलपंचायत समितीमध्ये दररोज हजारो नागरिक कामासाठी येतात. येथील अधिकारी नागरिकांची कामे वेळेत करत नाहीत. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्याची तक्रार करायची असेल तर तक्रारपेटी ही विनाकुलुपाची असल्यामुळे या ठिकाणी तक्रार कशी करायची असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.