आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोनदा आमदार, एकदा खासदार; आता रमल्या मुलांमध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कळंब - कळंबच्याइतिहासात कायम नाव कोरलेल्या कल्पनाई नरहिरे यांचं सध्या काय चाललंय, असा कुणालाही प्रश्न पडतो. त्या सध्या राजकारणात अभावानेच दिसत असल्या तरी कुणी पाणीवाली बाई तर कुणी महिलांचा आधार असलेली कल्पनाताई, अशी त्यांची ओळख सांगतात. त्यामुळे त्यांचा राजकीय प्रवास जनतेला सोबत घेऊन होता, हे स्पष्ट होते.त्या सध्या मुलांच्या शिक्षणासाठी मुंबईत वास्तव्याला असतात.त्यामुळे वरवर त्यांचा जनतेशी संपर्क कमी दिसतो. मात्र, अडीअडचणीच्या काळात त्या जनतेच्या मदतीला धावून येतात. 
 
कळंब मतदारसंघाच्या दोन वेळा आमदार उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात एक वेळा खासदार झालेल्या कल्पनाताई रमेश नरहिरे यांचा राजकीय प्रवास खरे तर रंजक आहे. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही त्यांना शिवसेनेने १९९५ मध्ये पहिल्यांदा विधानसभेची उमेदवारी दिली. विशेष म्हणजे त्या पहिल्याच निवडणुकीत कळंब - वाशी विधानसभा मतदार संघातून आमदार झाल्या. त्यांचे काम, चिकाटी आणि जनसंपर्क लक्षात घेऊन पक्षाने त्यांना पुन्हा एकदा म्हणजे १९९९ मध्ये उमेदवारी दिली. मतदारसंघातील जनतेने त्यांना पुन्हा निवडून दिले. या काळात त्यांनी गावागावात योजना राबविल्या.जनतेप्रमाणेच पक्षाचाही त्यांच्यावरचा विश्वास अधिक दृढ झाला. सभागृहात प्रश्न मांडण्याची पध्दत, ते सोडविण्यासाठी असलेली धडपड आणि एक महिला लोकप्रतिनिधी असतानाही त्यांनी जनमाणसांत उमटविलेला ठसा उल्लेखनीय होता. त्यामुळे पुढे २००४ मध्ये त्यांना उस्मानाबाद लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. पक्षनिष्ठा आणि शिवसैनिकांचा भक्कम पाठिंबा असल्याने शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कळंब तालुक्याने त्यांना भरघोस मते दिली शिवाय संपूर्ण जिल्ह्याने त्यांना बहुमताने निवडन आणले. लोकप्रतिनिधीपदाच्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावले. त्यात धनेगाव ते कळंब २९ कोटी रुपयांची कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजना, वाशी शहरासाठी पाणी पुरवठा योजना, वाशी तालुक्याची निर्मिती, गाव तेथे सभागृह, कळंब तालुक्यात सहा गाव पाणी पुरवठा योजना, लाखा रोड वरील मांजरा नदीच्या पात्रावरील मोठा पुल, विविध गावातील मुख्य रस्ते यासह विविध कामे करून त्यांनी जनमाणसांत आपली ओळख निर्माण केली. 

मुलीलाइंजिनिअर बनवायचेय: 
कल्पनाईनरहिरे राजकारणातून काहीशा अलिप्त झाल्या. त्यांनी मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार त्या मुंबई येथे मुलांच्या शिक्षणासाठी वास्तव्याला गेल्या. सध्या त्या गृहिणीच्या भूमिकेत आहेत. मुलगी नेहा मुंबई येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे तर मुलगा नीरज याचे इंजििनअरिंगचे शिक्षण पूर्ण झाले आहे. मात्र,त्यांचा कार्यकर्त्यांशी संपर्क कायम आहे. 
कल्पना नरहिरे, माजी खासदार 
 
पाणीवाल्या बाई 
कळंब वाशी तालुक्यात कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना आणल्या होत्या. त्यामुळे कल्पनाताई नरहिरे यांचे आजही नाव निघते. पाणीवाल्या बाई म्हणूनही त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली होती. तसेच यांनी गाव तेथे सभागृह बांधले होते. 
 
बातम्या आणखी आहेत...