आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्कृती संवाद वाढीतून दूर होऊ शकेल कर्नाटक - महाराष्ट्र वाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - हुतात्मा स्मृती मंदिरात शनिवारी सकाळी दोन दिवशीय कन्नड साहित्य संमेलनास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. मराठी आणि कन्नड भाषा टिकवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. हिंदी आणि इंग्रजी भाषा प्रांतिक भाषांना अाव्हान देत आहेत. कन्नड बोलीभाषा बोलली पाहिजे, ते अत्यावश्यक आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील वाद संपवून एकीने राहिले पाहिजे. यासाठी संस्कृतीची देवाण-घेवाण झाली पाहिजे, असा सूर राज्य कन्नड साहित्य संमेलनातून व्यक्त झाला. 
 
सकाळी ध्वजारोहण झाले. संमेलनाध्यक्षांची मिरवणूक पार पडली. त्यानंतर संमेलनाच्या सुरुवातीस राजेश्वरी पाटील (धारवाड) यांनी नाडगायन केले. कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांची गीते या वेळी सादर करण्यात आली. मान्यवरांचे स्वागत कन्नड साहित्य परिषद महाराष्ट्र घटकचे अध्यक्ष बसवराज मसुती यांनी केले. या वेळी कन्नड साहित्य परिषद, बंगळुरूचे राज्याध्यक्ष डाॅ. मनू बळगार, हिरेमठ संस्थान भालकीचे डाॅ. बसवलिंग पट्टदेवरू, होटगी मठाचे डाॅ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी, डाॅ. बी. बी. पुजारी, महापौर शोभा बनशेट्टी, मल्लिकार्जुन बडगेरी, वीरभद्र शिंपी, आमदार बी. आर. पाटील, मंगळा मेटगुड्ड, मधुमाला लिगाडे आदी उपस्थित होते. 

दोन राज्यांतील वाद संपवू : एम. बी. पाटील 
कर्नाटक आणि महाराष्ट्रात व्यापार सबंध आहे. मराठी आणि कन्नडमध्ये भेदभाव नको. दोन राज्यांतील वाद संपणे आवश्यक आहे. त्यासाठी दाेन्ही राज्यांनी प्रयत्न करावे. महाराष्ट्रास बसवेश्वरांबाबत कळवळा आहे, तर आम्हाला शिवाजी महाराजांबद्दल कळवळा आहे. विजयपुरात शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. कन्नड भाषेसाठी प्रयत्न सुरू आहेत, असे कर्नाटकचे जलसंपदामंत्री उद््घाटक एम. बी. पाटील म्हणाले. 

कन्नडविद्यार्थ्यांना कर्नाटकने करावी मदत 
राज्याबाहेरीलकन्नड विद्यार्थ्यांना कर्नाटक सरकारने मदत करावी. तंत्रज्ञानात कन्नड येणे आवश्यक आहे, असे मत डाॅ. मनू बळगार यांनी व्यक्त केले. 

सोलापूर विद्यापीठास सिद्धेश्वरांचे नाव द्या 
हे संमेलन भावपूर्ण आहे. भाषेपेक्षा भाव महत्त्वाचा आहे. सोलापूर विद्यापीठास श्री सिद्धेश्वरांचे नाव द्यावे. राज्याची भाषा जपा, असे हिरेमठ संस्थान भालकीचे डाॅ. बसवलिंग पट्टदेवरू म्हणाले. 

बसवेश्वर स्मारकासाठी २५ एकर जागा 
मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वरांचे वास्तव्य होते. तेथे राज्य सरकारच्या वतीने बसवेश्वर स्मारक उभारण्यात येत आहे. त्यासाठी २५ एकर जागा सरकार घेईल. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील संस्कृतीत देवाण-घेवाण चाललेली असते. सोलापुरात ५० टक्के लाेकांना कन्नड कळते, असे पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले. 

कर्नाटकचे जलसंपदामंत्री एम. बी. पाटील यांच्या हस्ते हुतात्मास्मृती मंदिरात कन्नड साहित्य संमेलनाचे उद््घाटन झाले. अध्यक्षस्थानी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार अॅड. शरद बनसोडे, महापौर शोभा बनशेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते. 
 
बातम्या आणखी आहेत...