आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साम्यवाद्यांचा केरळमधील दहशतवाद सरकार पुरस्कृत- प्रणव पवार यांचे प्रतिपादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केरळमध्ये होत असलेल्या हिंसाचाराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश सभा झाली. - Divya Marathi
केरळमध्ये होत असलेल्या हिंसाचाराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश सभा झाली.
सोलापूर - केरळ राज्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप कार्यकर्त्यांसह हिंदुत्ववादी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांच्या हत्यांचे सत्र सुरूच आहे. १९६८ पासून आजपर्यंत २३२ हिंदू कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आल्या. केरळमध्ये चालणारा दहशतवाद हा केरळ सरकार पुरस्कृत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संपर्क मंडळ सदस्य प्रणव पवार यांनी केले.
 
केरळमध्ये हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या होत असलेल्या हत्यांच्या विरोधात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश सभा झाली. या वेळी रा. स्व. संघाचे जिल्हा संघचालक शिवाजीराव पाटील, शहर संघचालक राजेंद्र काटवे, रंगनाथ बंग, जनता बँकेचे अध्यक्ष किशोर देशपांडे, उद्योजक पेंटप्पा गड्डम, राम देशपांडे, दिलीप पेठे, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक अंबादास गोरंटला, अभाविपचे प्रदेश सहमंत्री समर्थ बंडे, रमेश विश्वरूपे, सुधाकर देशमुख, भारत तांबोळकर आदी उपस्थित होते. 
 
केरळमधील कम्युनिस्ट सरकारची कायदा आणि सुव्यवस्था आहे. कम्युनिस्टांकडून संघाच्या कार्यकर्त्यांबरोबरच त्यांच्या घरातील लहान मुले, महिला यांच्याही हत्या करण्यात आल्या आहेत. अनेक स्वयंसेवकांना जखमी केले आहे. एका संघाच्या प्रचारकांची तर एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या केबिनमध्येच हत्या केली आहे. ही कृत्ये अतिरेकी, नक्षलवादीपेक्षाही भयावह असून यावर सरकारने कारवाई करावी, असे मत श्री. पवार यांनी व्यक्त केले.
 
 हिंसाचारात बळी पडलेल्या कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, किशोर देशपांडे, चन्नवीर बंकूर, यतिराज होनमाने यांची भाषणे झाली. तसेच राष्ट्रपतींना देण्यात येणारे निवेदन पवार यांनी वाचून दाखविले. रंगनाथ बंकापूर यांनी प्रास्ताविक केले.
 
सूत्रसंचालन नितीन कवठेकर यांनी केले तर आभार सूत्रसंचालन केले तर निलेश भंडारी यांनी आभार मानले. प्रसाद जिरांकलकीकर यांनी गायलेल्या वंदे मातरमने सभेची सांगता झाली. उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी यांनी हे निवेदन स्वीकारले. 
 
बातम्या आणखी आहेत...