आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकमंगलच्या अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी पाेलिसात तक्रार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्शी- कागदपत्रांचा गैरवापर आणि  बनावट स्वाक्षऱ्या  करून परस्पर कर्ज घेवून  लोकमंगल अॅग्रोने फसवणूक केली. मात्र अाता लोकमंगलचे अध्यक्ष, व्यवस्थापक, कार्यकारी संचालक, देना बँकेचे अधिकारी आणि हे  प्रकरण मिटवण्यासाठी जिवे मारण्याची धमकी देत अाहेत. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची  मागणी  इंदापूर येथील महादेव मस्के यांनी पोलिसांकडे केली आहे.  कारवाई न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी तहसीलसमोर सपत्निक बेमुदत धरणे आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड.  जीवनदत्त आरगडे यांनीही सरकार मंत्र्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या राजीनाम्याची पत्रकार परिषदेत मागणी केली.  

लोकमंगलने परस्पर त्यांच्या नावे कर्ज घेतल्याचे उघड झाले.  लोकमंगलच्या या कारभाराची ‘दिव्य मराठी’ने पोलखोल केली.  त्यानंतर लोकमंगलने कर्ज भरणा करुन मस्के यांना  थकबाकी नसल्याचा दाखला घरपोच दिला. याप्रकरणी शुक्रवारी  मस्के यांनी पोलिस उपअधीक्षकांकडे तक्रार केली.  
बातम्या आणखी आहेत...