आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: कर्जमाफीच्या आशेमुळे जिल्हा बँकेला अाजवरचा सर्वाधिक 61 कोटींचा तोटा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - संचालकांशी संबंधित उद्योगाकडे थकलेल्या कर्जामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अर्थकारण बिघडले होते. त्यातून सावरण्याचे प्रयत्न सुरू असतानाच गत अर्थिक वर्षात शेतकरी कर्जमाफीचा विषय चर्चेत आला. त्याने वसुलीवर विपरीत परिणाम झाला. या दोन्ही गोष्टींमुळे जिल्हा बँकेला गत आर्थिक वर्षात ६१ कोटी ५५ लाख रुपयांचा निव्वळ तोटा झाला. बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा मोठा तोटा सहन करावा लागला आहे. एकूण वाटप केलेल्या हजार ४९५ कोटी रुपयांच्या कर्जांपैकी शेतीचे ६२३ तर बिगरशेतीचे ४२९ असे एकूण हजार ५२ कोटी रुपयांची कर्जे थकीत झाली. ढोबळ अनुत्पादक कर्जाचे प्रमाण (एनपीए) ३१.५८ टक्के झाले. त्याचे निव्वळ प्रमाण २२.३२ टक्के होते. बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी ही माहिती दिली.
 
रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे १० टक्क्यांच्या आत आदर्श मानले जाते. त्याचे उल्लंघन झाल्याने आता बँकेवर पुन्हा रिझर्व्ह बँकेचे डोळे वटारतील, हे नक्की. प्रशासकीय कामकाजात केलेल्या काटकसरीमुळे बँकेच्या बचतीत यंदा वाढ झाली. एवढीच जमेची बाजू आहे. वेतनावर दरवर्षी ५४ कोटी रुपयांचा खर्च होत होता. यंदा मात्र ५७ कोटी रुपये झाला. कर्मचारी अधिकाऱ्यांना पगारवाढ देण्यात आलेली नाही. मात्र महागाई भत्ता वाढल्याने हा खर्च वाढला. इतर खर्चामध्ये मोठी बचत झाली. गेल्या वर्षी चहापानाचा इतर खर्च हा २७ कोटी होता. यंदा मात्र हा खर्च १६ कोटी झाला आहे. अध्यक्ष पाटील यांच्यामुळे कोटी ८२ लाख रुपये वाचले. मार्चअखेरची बँकेची आर्थिक स्थिती पाहता, आता कर्जवसुलीशिवाय दुसरा पर्याय नाही. 
 
८१ कर्मचारी कमी 
जिल्हा बँकेतील प्रशासकीय खर्चात कपात करण्यासाठी गेल्या दीड वर्षात कठोर धोरण अवलंबले. श्री. पाटील यांच्या कालावधीत १६ कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले. ४४ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. ११ कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्यात आले तर या कालावधीत १० कर्मचारी मृत झाले. 
 
बँकेची आर्थिक स्थिती 
एकूण वसूलपात्र रक्कम (जून २०१६ अखेर) : हजार ९३७ कोटी रुपये 
मार्च २०१७ अखेर वसूल रक्कम : ५०१ कोटी ७६ लाख रुपये 
एनपीए मार्च २०१६ : ३१.११ टक्के 
एनपीए मार्च २०१७ :३१.५८ टक्के 
एनपीएसाठी तरतूद, मार्च २०१६ : २५६ कोटी 
एनपीएसाठी तरतूद मार्च २०१७ : २९७ कोटी 
 
तरीही बँक सुरक्षित 
- गत आर्थिक वर्षात बँकेला तोटा झाला असला तरीही बँक आजही पूर्वीएवढीच सुरक्षित अाहे. बँकेचे नक्त मूल्य २७६ कोटी रुपये एवढे आहे. सीआर एआर १०.९३ टक्के आहे. नक्त मूल्य ज्यावेळी शून्यावर येते, त्यावेळी सहकार कायदा कलम ११० अन्वये संचालक मंडळ बरखास्तीची कारवाई केली जाते. तशी स्थिती अद्याप झालेली नाही. बँक सुरक्षित आहे.
राजनपाटील, अध्यक्ष, जिल्हा बँक, साेलापूर 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...