आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबादच्या समतानगरमध्ये साकारली माणुसकीची भिंत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद शहरात समता मध्यवर्तीच्या वतीने माणुसकीची भिंत उभारण्यात आली आहे. - Divya Marathi
उस्मानाबाद शहरात समता मध्यवर्तीच्या वतीने माणुसकीची भिंत उभारण्यात आली आहे.
उस्मानाबाद - शहरातील समतानगर येथे समता मध्यवर्ती गणेश मंडळातील युवकांनी पुढाकार घेऊन माणुसकीची भिंत तयार केली आहे. याच्या माध्यमातून कोणतीही वस्तू दान देता येणार असून या उपक्रमाची सुरुवात महाशिवरात्रीपासून होणार आहे. भिंतीवर वस्तू ठेवण्यासाठी हँगरही लावण्यात आले आहेत. 
 
वापरलेले कपडे, बुट, चपला, पिशव्या अन्य साहित्य सातत्याने विकत घेण्याची अनेकांची हौस असते. यामुळे जुन्या साहित्याचा प्रश्न निर्माण होतो. असे साहित्य दान देण्याची प्रत्येकांची इच्छा असते. मात्र, दान कोणाला द्यावे, हेच लक्षात येत नाही. यामुळे साहित्य, वस्तू घरातच कुजत पडतात. ही परिस्थिती ओळखून येथील समता मध्यवर्ती मंडळाच्या युवकांनी ‘माणुसकीची भिंत’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. यासाठी प्रत्येक युवकांनी पुढाकार घेऊन समतानगर येथील एका दुकानाच्या भिंतीला ‘माणुसकीच्या भिंती’चे स्वरूप दिले आहे. यासाठी आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे. तसेच कपडे अन्य साहित्य ठेवण्यासाठी हँगरचीही व्यवस्था भिंतीसाठी करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी संदीप साळुंके, अॅड. अमर लाव्हरे, वैभर मोरे, सुजित साळुंके, समर्थ हाजगुडे, निखील शेरखाने, स्वप्निल नाईकवाडी, आशिष पाटील, खुद्दुस मोमीन, अकबर पठाण, सुधीर घोडके, धीरज अंबेकर, राहुल जगताप यांनी पुढाकार घेतला आहे. 

महाशिवरात्रीला शुभारंभ : शुक्रवारी(दि.२४) महाशिवरात्री साजरी होणार आहे. ‘माणुसकीची भिंत’ या उपक्रमाला सुरुवात महाशिवरात्रीला होणार आहे. याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. शहरातील कोणत्याही व्यक्तीला येथे साहित्य, वस्तू ठेवता येणार आहेत. तसेच कोणालाही हव्या असलेल्या वस्तू, साहित्य नेता येणार आहे. भिंतीवर तशी सूचनाही रंगवण्यात आली आहे. 

मागणीतून उपक्रम 
- वस्तू, कपडे देण्याची प्रत्येकांची इच्छा असते. मात्र, कोणाला द्यावेत हे समजत नाही. समतानगर परिसरात देण्याची इच्छा असलेले नागरिक मोठ्याप्रमाणात आहेत. त्यांच्याकडूनही अशी मागणी झाल्याने उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
-संदीपसाळंुके, समता मध्यवर्ती मंडळ. 
बातम्या आणखी आहेत...