आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महावितरणची अवघ्या पंधरा दिवसांत तब्बल ३६ कोटींची वीजबिल वसुली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र प्रशासकीय कार्यालयात २४ पर्यंत या जुन्या नोटा चालतील, असा निर्णय शासनाने दिला. त्यामुळे १० ते २४ नोव्हेंबरपर्यंत महावितरणने सोलापूर जिल्ह्यातून ३६ कोटी ३८ लाख रुपयांची वसुली केली.
महावितरणकडे भरमसाठ थकबाकी आहे. नोटा बदलामुळे सर्व प्रशासकीय कार्यालयाच्या तिजोरीत पैशाचा खणखणाट होतोय. यात महावितरणसुद्धा अपवाद नाही. महावितरणने सोलापूर जिल्ह्यातून १० ते २३ नोव्हेंबरपर्यंत ३० कोटी १८ लाख रुपये वसूल केले. तर ऑनलाइनच्या माध्यमातून कोटी २० लाख रुपयांचा भरणा झाला. २४ रोजी रात्री वाजेपर्यंत महावितरणने कोटी रुपये वसूल केले. यामध्ये शहरातून एक कोटीचा भरणा आहे. शहर आणि जिल्ह्यात महावितरणने २७० वसुली केंद्रे ठेवली होती. ही केंद्रे २४ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत चालू असल्यामुळे वसुलीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती अधीक्षक अभियंता धनंजय औंढेकर यांनी दिली.
^राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या सूचनेप्रमाणे आमच्या सर्व टाेल नाक्यावर स्वाइप मशीन मागवले आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत ही मशीन बसवण्यात येईल. जेवढे शक्य झाले तेवढे सुट्या पैशांची सोय केली आहे. वाहनधारकांची गैरसोय होऊ नये याची दक्षता घेण्यात आली आहे.” प्रवीणजिंदल, प्रोजेक्ट इन्चार्ज, आयएलएफएस कंपनी
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या करवसुलीसाठी एक हजार ५०० रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत ग्रामपंचायतीची कर वसुली फक्त सहा लाख ८५ हजार रुपये झाली. इतर स्थानिक स्वराज्य संस्थांची कोट्यवधी रुपयांची कर वसुली झाली.
जिल्ह्यातील १०२९ ग्रामपंचायतींना घरपट्टी, पाणीपट्टी इतर कराची वसुली करण्याची संधी होती. पण, ग्रामसेवकांच्या संपामुळे करवसुलीवर परिणाम झाला. त्याचा फटका ग्रामविकासाला बसण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या करवसुलीसाठी जुन्या नोटा घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कर वसुलीसाठी जुन्या नोटांचे आदेश दिले होते. पण, बहुतांश ग्रामपंचायतीचे बँक खाते जिल्हा बँकेत आहेत. शासनाने त्या बँकेस पैसे घेण्यास घातलेल्या निर्बंधामुळेही वसुलीवर परिणाम झाल्याचे ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र अहिरे यांनी सांगितले.
सोलापूर पाचशेआणि हजार रुपयांच्या आधारे महापालिका तिजोरीत दहा नोव्हेंबरपासून २५ कोटी रुपये जमा झाले आहेत. गुरुवारी सुमारे १.२५ काेटी रुपये जमा झाले. त्यात एलबीटी विभागाचे ३७ लाख रुपये आहेत. सराफ व्यापाऱ्यांनी एलबीटीची रक्कम भरल्याने एकही सराफ दुकानावर महापालिकेने कारवाई केली नाही. थकीत मिळकतीवर मात्र दहा जणांचे नळ तोडण्यात आले. मोहीम १० नोव्हेंबरपासून राबवण्यात आली. गुरुवारी २५ पथके तयार करून वसुली मोहीम सुरू करण्यात आली. सुमारे सव्वा कोटी रुपये जमा झाले.
सराफाकडून ३७ लाख
एलबीटीपोटी सराफ व्यापाऱ्यांनी गुरुवारी ३७ लाख रुपये जमा केले. सराफ कट्यात गिरीश देवरमनी यांच्या दुकानात महापालिकेचे अधिकारी अभिजित हराळे, लक्ष्मण चलवादी, राहुल कुलकर्णी बसले होते. चेंबर आॅफ काॅमर्सचे अध्यक्ष राजू राठी, प्रभाकर वनकुद्रेंसह अन्य व्यापारी उपस्थित होते.
डिसेंबर मध्यरात्री पर्यंत सरकारने दिली मुदतवाढ
सोलापूर सर्वटोल वसुली मक्तेदारांनी स्वाइप मशीन आणि इतर आधुनिक यंत्रे आणली आहेत, अशी माहिती मुंबई एमएसआरडीसी अंतर्गत टोल विभागाचे मुख्य अभियंता डी. ए. सावंत यांनी दिली. सरकारने डिसेंबर मध्यरात्री पर्यंत मुदतवाढ दिल्याची घोषणा गुरुवारी केली. त्यामुळे टोल नाक्यावर तोपर्यंत सर्व आधुनिक यंत्रे बसविण्यात येतील अशी चिन्हे आहेत.
नोटा बंदीमुळे सरकारने २४ तारखेपर्यंत टोल मुक्त केले होते. २४ तारखेच्या रात्री १२ वाजल्यापासून टोल सुरू होणार असल्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होऊ नये याकरता सर्व टोल वसुली मक्तेदारांना सर्व आधुनिक यंत्र आणि सुट्टे पैशांची व्यवस्था करण्याची सूचना संबंधित विभागाकडून देण्यात आली होती. एमएसआरडीसी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सूचना दिल्या होत्या. डिसेंबर पर्यंत सर्व टोल नाक्यावर स्वाइप मशीन आणि इतर आधुनिक यंत्र बसवण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
बातम्या आणखी आहेत...