आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना मुलींच्या भाग्यातच नाही; वर्षात केवळ २८ लाभार्थी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महाराष्ट्राचे महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी वाजतगाजत “माझी कन्या भाग्यश्री’ योजनेची घोषणा केली. परंतु, ही योजना बुचकळ्यात टाकणारी आहे. ही योजना लाभार्थींच्या भाग्यातच नाही, असे चित्र आहे. संपूर्ण शहरात मागील वर्षभरात केवळ २८ महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. उरलेल्या महिलांना योजनेतील अटी, तांत्रिक अडचणी आणि प्रचार - प्रसाराचा अभाव यामुळे लाभ मिळालाच नाही. परिणामी, ही योजना कागदावरच राहिल्याचे दिसत आहे. 

एप्रिल २०१६ मध्ये ही योजना सुरू झाली. मुलींचे संगोपन आणि शिक्षण यासाठी माता - भगिनींना मदत व्हावी हा हेतू यामागे होता. मुली वाचवा मुली शिकवा हे ब्रीद प्रत्यक्षात यावे. मुलगी सक्षम व्हावी असे उद्दिष्ट या योजनेमागे होते. मात्र यातील नियमांनी या योजनेचे बारा वाजवले आहेत. प्रकल्प अधिकारी आणि सेविका यांनाच मुळात ही योजना काय आहे, याचा लाभ कोणाला द्यायचा हे समजलेले नाही. पूर्ण माहिती नसल्यामुळे गेल्या वर्षभरात या योजनेचा लाभ योग्य रीतीने झाला नाही.

शासनाचे म्हणणे असे... 
 
१. ज्या मातेने एकुलत्या एका मुलीवर अंतिम कुटुंब नियोजन केलेले आहे, अशा लाभार्थींना मुलीचा जन्मदिन साजरा करण्यासाठी हजार रुपये, मुलगी वर्षे वयाची होईपर्यंत दर्जेदार पोषण आहार देण्यासाठी वर्गांकरिता १० हजार रुपये मुलीच्या वी ते १२ वी पर्यंतच्या शिक्षणादरम्यान पोषण आहार इतर खर्चासाठी वर्षांकरिता एकूण २१ हजार रुपये इतका लाभ मिळणार आहे. 

२.ज्या मातेने दोन मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली असेल, अशा परिस्थितीत जन्मदिन साजरा करण्यासाठी हजार ५०० रुपये, दोन्ही मुली वर्षे वयाच्या होईपर्यंत दर्जेदार पोषण आहार देण्यासाठी वर्षांसाठी १० हजार रुपये, दोन्ही मुलींना इयत्ता ली ते वी पर्यंत पोषण आहार इतर खर्चासाठी वर्षांसाठी १५ हजार रुपये, दोन्ही मुलींना इयत्ता वी ते १२ वी पर्यंत पोषण आहार इतर खर्चासाठी वर्षांसाठी २२ हजार रुपये लाभ देण्यात येणार आहे. मात्र मुलगी मुलगा असलेल्या बालकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. 

३.दारिद्र्यरेषेखालील कुटुंबात जन्मणाऱ्या मुलींसाठी विमा योजना राबवण्यात येणार आहे. यामध्ये मुलींच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत २१ हजार २०० रुपयांचा विमा एल.आय.सी. मध्ये शासनामार्फत काढण्यात येणार आहे. यासाठी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर एक लाख रुपयांच्या विम्याची रक्कम अदा करण्यात येणार आहे. तसेच मुलीच्या पालकांचाही विमा काढण्यात येणार असून यामध्ये मुलींच्या पालकांचा अपघात किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास पुढीलप्रमाणे विम्याची रक्कम मिळणार आहे. नैसर्गिक मृत्यू झाल्यास ३० हजार रुपये, अपघाती मृत्यू झाल्यास ७५ हजार रुपये, दोन डोळे किंवा दोन अवयव निकामी झाल्यास ७५ हजार रुपये, एक डोळा अथवा एक अवयव अपघातामुळे निकामी झाल्यास ३७ हजार ५०० रुपये विम्याचा लाभ मिळणार आहे. 

४.पहिल्या मुलीनंतर कुटुंब नियोजन केले असल्यास मुलीच्या मातेच्या सासू सासऱ्यांना हजारांपर्यंत सोन्याची नाणी देण्यात येणार आहे. तसेच मुलींची संख्या अधिक असलेल्या प्रत्येक जिल्ह्यात एका ग्रामपंचायतीला पाच लाखांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. 

नव्या आदेशानुसार अंमलबजावणी 
^मी नुकताच बदली होऊन आलो आहे. अजून काम पाहायचे आहे. येणाऱ्या नव्या आदेशानुसार पुढची योजना राबवणार आहे. त्यानुसार जास्तीत जास्त महिला मुलींना याचा लाभ देण्याचा प्रयत्न करणार आहे. राजेंद्र कोकरे, योजना अंमलबजावणी प्रमुख अधिकारी 

लोकजागृती नाही 
^अशा प्रकारची काही योजना आहे हे माहितीच नाही. आमच्यापर्यंत ती पाेहोचलीच नाही. अशा योजना प्रत्यक्षात मिळाल्या तर आमच्या मुलींना उत्तम मदत होऊ शकते. मात्र त्याचा प्रचार होणेही गरजेचे आहे. उषा बेलभंडारे, गृहिणी 

योजनाच किचकट 
^शासनाला खऱ्या अर्थाने मुलींचे संगोपन आणि शिक्षण यासाठी काम करायचे असेल तर योजना सरळ सोपी करावी. त्याचे निकष उत्तम असावेत. ज्याने सामान्यांना काहीही त्रास होता कामा नये. ज्याचा उपयोग होत नाही अशा योजना कामाच्या नाहीत. त्याने सरकारची बदनामीच होते. अंजली लांडगे, गृहिणी 
 
आपल्या प्रतिक्रिया : तुमची पसंती नावासह ९२०००१२३४५याक्रमांकावर एसएमएस करा. 
पहिल्या मुलीच्या जन्मानंतर हजार द्यायचे, की मुलगी दुसरी असेल तरी हजार रुपये द्यायचे, हे अद्याप निश्चित केलेले नव्हते. सोन्याचे नाणे मुलीच्या वडिलांच्या की आईच्या आई-वडिलांना द्यावे याबाबत स्पष्टता नव्हती. राज्य शासन ही ठेव कुठे ठेवणार, याबाबतही स्पष्टता नाही. 

एक किंवा दोन मुलींवर सहा महिन्याच्या आता कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करावी अशी अट या योजनेत आहे. मुळात डॉक्टरच या गोष्टीला लवकर तयार होत नाही. शस्त्रक्रियेसाठी किमान पाच वर्षे थांबण्याचा आग्रह डाॅक्टरांचा असतो. योजनेतली ही सर्वात मोठी त्रुटी आहे. 

ही आहे अडचण योजनेतील 
एप्रिल २०१६ रोजी घोषणा झाली. ही योजना सुरुवातीला फक्त दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांसाठी होती. नंतर बदल करण्यात आला. आता याचा लाभ कोणत्याही कुटुंबांना घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत एप्रिल २०१६ नंतर जन्मलेली मुलगी १८ वर्षांची होईल, तेव्हा तिच्या खात्यावर शासन एक लाख रुपये जमा करणार आहे. मुलीचा जन्म झाल्यानंतर तिच्या जन्मोत्सवासाठी कुटुंबीयांना पाच हजार रुपये मिळतील. आजी-आजोबांना पाच हजारांचे सोन्याचे नाणे भेट देण्यात येणार आहे. मुलगी पाच वर्षांची होईपर्यंत प्रत्येक वर्षी तिच्या पोषणासाठी दोन हजार रुपये मिळणार आहेत. मुलगी शाळेत गेल्यानंतर पहिली ते पाचवीपर्यंत प्रत्येक वर्षाला शिक्षणासाठी अडीच हजार रुपये देण्यात येणार आहेत. सहावी ते बारावीच्या शिक्षणासाठी प्रत्येक वर्षी तीन हजार रुपयांप्रमाणे पैसे देण्यात येणार आहेत. मुलगी अठरा वर्षांची झाल्यानंतर तिला एकरकमी एक लाख रुपये मिळणार आहेत. संबंधित कुटुंबात दोन मुली असतील तर त्यातील प्रत्येक मुलीला या योजनेतील निम्म्या रकमेचा लाभ मिळणार आहे. 

योजनेवर होत नसल्याचे दिसते 
अडीच लाखावर कुटुंबे असलेल्या शहरात केवळ २८ कुटुंबांना लाभ झाला. त्यामुळे ही योजना गुणवत्तेच्या परीक्षेत नापास झाली आहे हे स्पष्ट दिसते आहे. लाखोंच्या तुलनेत केवळ पंढरपूर भाग वगळता २८ मुलींना याचा लाभ झाला आहे. योजनेवर अंमल होत नसल्याचे दिसत आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...