आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एक मराठा, लाख मराठा’ नारा देत... सोलापुरहून दीड लाख मावळे मुंबईला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अॉगस्ट या क्रांतिदिनी मुंबईत आयोजिलेल्या मराठा समाज क्रांती मूक महामोर्चासाठी साेलापूर शहर जिल्ह्यातून सुमारे दीड लाख जण मंगळवारी रवाना झाले. ‘एक मराठा, लाख मराठा’ असा नारा देत महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे मराठा समाज एकवटणार आहे. त्यात पश्चिम महाराष्ट्रात सोलापूरची संख्या सर्वाधिक अाहे. सोमवारपासूनच रेल्वे, एसटी, खासगी वाहनांतून मराठ्यांचे जत्थेच्या जत्थे गेले. मुंबईच्या विराट महामोर्चात सोलापूरचे महत्त्वाचे योगदान ठरेल. 
 
बार्शी, मंगळवेढा, पंढरपूर, माढा, करमाळा, कुर्डुवाडी, उत्तर आणि दक्षिण सोलापूर या तालुक्यांतून समाजबांधवांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. तालुकानिहाय समन्वय असल्याने वाहने एकामागून एक निघाली होती. भगवे झेंडे बांधून मोठ्या संख्येने या गाड्या पुणे रस्त्यावरून मुंबईकडे रवाना झाल्या. सोलापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्ग वाहनांमुळे फुल्ल झाला होता. मराठा क्रांती मोर्चाचे स्टीकर लावलेली वाहने सर्वत्र दिसत होती. 
 
रेल्वेगाड्यांनाही गर्दी 
मोर्चात सहभागी होण्यासाठी मराठा समाजबांधव मिळेल त्या गाडीने मंुबईत जाण्यासाठी प्रयत्नशील होते. सिद्धेेश्वर, मिनी सिद्धेश्वर इतर गाड्यांना गर्दी होती. भगवी टोपी, उपरणे, झेंडे घेतलेले मराठा कार्यकर्ते रेल्वे स्टेशनवर दिसत होते. महिलांचाही सहभाग मोठा होता. 
 
छावा संघटना देणार मोर्चेकरांना भाकरी, शेंगा चटणी 
महामोर्चाची व्यापकता मराठा समाजबांधवांचा लक्षणीय सहभाग लक्षात घेऊन मराठा बांधवांचे खाण्या-पिण्यावाचून हाल होऊ नये म्हणून राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने पाच हजार कडक भाकरी शेंगा चटणी, ठेचा वाटण्यात येणार आहे. अल्पोपाहाराची ही शिदोरी घेऊन सोलापुरातील मावळे मंगळवारी दुपारी अडीच वाजता मुंबईकडे रवाना झाले. छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पवार यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या वेळी शेखर फंड, ओंकार यादव, उमेश पवार, मनीष जाधव, दीपक पेठकर, राजू पाटील आदी उपस्थित होते. तेजस्विनी महिला बचत गटाच्यावतीने हजार मोर्चेकरांसाठी जेवण मुंबईला पाठवले. 
 
जिल्ह्यातून मराठा बांधव रवाना 
सोलापूर एक मराठा, लाख मराठाच्या जयघोषात जिल्ह्यातील ११ तालुक्यांमधील गावागावातून मराठा समाजबांधव मंगळवारी मुंबईला रवाना झाले. साेमवारीही अनेकजण गेले होते. मंगळवारी (दि. ८) दिवसभर विविध वाहनांनी मराठा समाजबांधव मुंबईकडे निघाले होते. जिल्ह्यातील अक्कलकोट, पंढरपूर, कुर्डुवाडी, सांगोला या रेल्वेस्थानकांवरही गर्दी झाली होती. 
 
पंढरपूर शहर तालुक्यातून सुमारे १०० वाहनांमधून २० हजार, अक्कलकोटमधून ५० वाहनांद्वारे दीड हजार, उत्तर सोलापुरातून अडीच हजार, मोहोळमधून ३० हजार, बार्शी तालुक्यातून १५ हजार, माढ्यातून ३५ हजारांहून अधिक समाजबांधव मुंबईला गेले आहेत. सांगोला, माळशिरस, करमाळा, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर तालुक्यातूनही मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव या मोर्चात सहभागी होणार आहेत. दरम्यान, मोर्चात सहभागी होणाऱ्यांसाठी विविध सामाजिक संघटना, संस्था यांच्याकडून भोजन, पाणी आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. 
 
>जिल्ह्यातूनच दोन लाख समाजबांधव गेल्याचा अंदाज आहे. शहरातून ५० हजार जण गेले. त्यामुळे सोलापूरचा आकडा अडीच लाखांचा झाला. बार्शी, मंगळवेढ्यातून सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. माढा, कुर्डुवाडी येथील समाजबांधव रेल्वेगाड्यांनी गेले. 
'' दासशेळके, मराठा महासंघाचे ज्येष्ठ नेते 
बातम्या आणखी आहेत...