आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने, वाहन, रिअल इस्टेट क्षेत्रात दिवाळीच दिवाळी, सराफ पेढ्या चकाकल्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- दिवाळी म्हटल्यानंतर कपडे आणि फराळ या दोन गोष्टींकडेच प्रामुख्याने पाहिले जाते. सामान्य माणसाला त्याच्या पलीकडची दिवाळी माहीतही नसते. परंतु दिवाळीतील मुहूर्तांवर मध्यमवर्गीय मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. त्यासाठी सुरक्षित संधी शोधतात. त्याच्या प्राधान्यक्रमात प्रथम क्रमांक मिळवतो तो साेने. त्यानंतर फ्लॅट, वाहन, मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू. यंदाच्या दिवाळीत सोन्याचा बाजार चकाकून गेला. रिअल इस्टेटमध्येही बऱ्यापैकी गुंतवणूक झाली. हजारो दुचाकी आणि चारचाकी रस्त्यावर आल्या. दुष्काळी स्थिती अनुभवूनही यंदा ग्राहकांनी भरभरून खरेदी केल्याचे व्यापारी सांगतात.
अगदी सोन्याचे दिवस, भरभरून केली खरेदी
^यंदाच्यादिवाळीत सोन्याला अगदीच सोन्याचे दिवस आले होते. ग्राहकांनी भरभरून खरेदी केली. वेढण्या, वळी, सुवर्णनाणे या प्रकारांना ग्राहकांनी पसंती दिली. सोन्याच्या उतरत्या दराने दिवाळीत स्थैर्य मिळवले होते. त्यामुळे मोठी खरेदी झाली.'' गिरीशदेवरमनी, अध्यक्ष, सराफ व्यापारी असोसिएशन

यंदाच्या वर्षी दिवाळी वाटली नाही
तयारकपड्यांच्या बाजारात ग्राहक मोठ्या संख्येने गेल्याने यंदा दिवाळी वाटलीच नाही. यापूर्वीच्या दिवाळीत आम्ही रात्र आणि दिवस एक करून काम करायचो. कामगारही चांगली कमाई करायचे. परंतु आता ते दिवस राहिले नाहीत.'' श्रीनिवासगंजी, कृष्णा जेन्ट्स टेलर्स
रिअल इस्टेटमध्ये दिल्या अनेकविध योजना दिवाळी निमित्त बांधकाम व्यावसायिकांनी अनेकविध योजना दिल्या. शहराच्या चोहोबाजूंनी बांधकाम प्रकल्पांची माहिती दिली. अगदी ११ लाखांपासून २२ लाखांपर्यंतचे फ्लॅट, ३० ते ३५ लाखांत स्वतंत्र बंगलो अशी त्यांची रचना होती. दिवाळी मुहूर्तावर मागणी नोंदवणाऱ्यांना अनेक सवलतीही देऊ केल्या. बस आणि रेल्वे स्थानकापासून एक ते दोन किलोमीटर अंतरावर प्रकल्प स्थळ दाखवण्यात आले. त्यामुळे अनेक कुटुंबांनी या स्थळांना भेटी दिल्या.

दरातील घसरणीमुळे सोन्याला दिले प्राधान्य
सोन्याच्यादरातील घसरण दिवाळीतही सुरू राहिल्याने गुंतवणुकीसाठी ग्राहकांनी सोन्याला प्राधान्य दिले. त्यामुळे प्रकाशाच्या या सणात सराफ पेढ्या चकाकून गेल्या. पूर्व मंगळवार पेठेतील सराफ बाजार आणि अशोक चौकातील सराफांच्या दुकानांत ग्राहकांची गर्दी होती. धनत्रयोदशी, पाडवा आणि भाऊबीज अशा तिन्ही मुहूर्तांवर सोन्यांची मोठी खरेदी झाली. २६ हजार ३०० (प्रती १० ग्रॅम)च्या आसपास सोन्याचे दर होते. त्यात १०० ते २०० रुपयांचा चढ-उतार होता.

तयार कपड्यांना पसंती, टेलरकडे पाठ
नवीनकपड्यांशिवाय दिवाळी होऊच शकत नाही. त्यामुळे वस्त्र दालनेही फुलून गेली होती. साड्या, पंजाबी ड्रेस, मुलांचे कपडे यांची दालने गजबजली. परंतु शिंप्यांकडे अपेक्षित काम नव्हते. त्याचे कारण ग्राहकांनी तयार कपड्यांना मोठी पसंती दिली. मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत तयार कपडेच घेतले. नावीन्यपूर्ण जीन्स आणि टी-शर्टस मोठ्या प्रमाणात विकले गेले. परिणामी टेलर मंडळी दिवाळी असूनही एरवीप्रमाणेच काम करत असल्याचे चित्र होते.