आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद: ‘आधी लगीन लोकशाहीचे’ कंडारीतील तरुणांचे लोकशाही प्रेम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परंडा- तानाजी मालुसरे यांचे ‘आधी लगीन कोंडाण्याचे मग रायबाचे’, हे इतिहासकालीन उद्‌गार प्रसिद्ध आहेत. तालुक्यातील कंडारी येथे गुरुवारी (दि.१६) याची प्रचिती आली. 

कंडारी येथील जितेंद्र सूर्यवंशी, समाधान जाधव यांचे मतदानादिवशी (गुरुवारी) लग्न होते. दोन्ही नवरदेवांची घोड्यावरून सवाद्य वरात काढण्यात आली. वरात मतदान केंद्राजवळ आल्यावर दोन्ही नवरदेवांनी मतदान केल्यावरच विवाह लावण्याची इच्छा व्यक्त केली. त्याप्रमाणे नातेवाईक गावातील मंडळींनी घोड्यावर बसलेल्या नवरदेवास मतदान केंद्रावर आणले. यावेळी गावकरी वऱ्हाडी मंडळींनी गर्दी केली होती. नवरदेव जितेंद्र सूर्यवंशी समाधान जाधव यांनी घोड्यावरून खाली उतरले. त्यांनी मतदान केंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतरच विवाह सोहळ्यासाठी रवाना झाले. 

लग्नाच्यादिवशीच मतदान आले. यामुळे मतदानाचे कर्तव्य बजाविल्यानंतर विवाह सोहळ्यास जाण्याचा निर्णय मी घेतला. मतदानाचे समाधान आहे.
- समाधान जाधव, नवरदेव, कंडारी 
बातम्या आणखी आहेत...