आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोभा बनशेट्टीच महापौर, बत्तुल होणार उपमहापौर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेच्या महापौर पदासाठी भाजपने शनिवारी ठरविल्याप्रमाणे महापौर पदासाठी शोभा बनशेट्टी तर उपमहापौर पदासाठी शशिकला बत्तुल यांची उमेदवारी निश्चित केली. तर काँग्रेस, शिवसेना एमअायएमनेही उमेदवार दिले अाहेत. या सर्वांनी रविवारी दुपारी अापले उमेदवारी अर्ज महापालिकेत दाखल केले. मार्च रोजी निवडणूक होणार अाहे. बहुमताच्या जोरावर बनशेट्टी बत्तुल या निवडून येतील. 
 
रविवारी सकाळी दहा वाजल्यापासून महापालिकेत नवनिर्वाचित नगरसेवकांची गर्दी सुरू झाली. भाजप नगरसेवक श्रीनिवास करली आणि काेंडी यांनी महापालिकेच्या कौन्सिल हॉलच्या पायरीवर माथा टेकून प्रवेश केला. प्रथम शिवसेनेतर्फे कुमुद अंकाराम यांनी महापौर पदासाठी तर अमोल शिंदे यांनी उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर एमआयएमतर्फे महापौर पदासाठी नूतन गायकवाड तर उपमहापौर पदासाठी अजहर हुंडेकरी, त्यानंतर भाजपतर्फे बनशेट्टी बत्तुल तर कॉँग्रेस-राष्ट्रवादीतर्फे महापौर पदासाठी प्रिया माने तर उपमहापौर पदासाठी किसन जाधव यांचे अर्ज दाखल झाले. दरम्यान मार्च रोजी दुपारी ११ वाजता जिल्हाधिकारी रणजितकुमार यांच्या अध्यक्षतेखाली महापौर पदाची निवडणूक होणार आहे. हात उंचावून, आपले नाव सांगून आपले मत कोणाला हे सांगणे बंधनकारक असणार आहे. जास्त मते मिळतील तो उमेदवार विजेता घोषित करण्यात येईल. 
 
पदासाठीतर अमोल शिंदे यांनी उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर एमआयएमतर्फे महापौर पदासाठी नूतन गायकवाड तर उपमहापौर पदासाठी अजहर हुंडेकरी, त्यानंतर भाजपतर्फे बनशेट्टी बत्तुल तर कॉँग्रेस-राष्ट्रवादीतर्फे महापौर पदासाठी प्रिया माने तर उपमहापौर पदासाठी किसन जाधव यांचे अर्ज दाखल झाले. 

मार्च रोजी मतदान 
महापालिकेच्या सभागृहामध्ये मार्च रोजी दुपारी ११ वाजता जिल्हाधिकारी रणजितकुमार यांच्या अध्यक्षतेखाली महापौर पदाची निवडणूक होणार आहे. यावेळी हात उंचावून, आपले नाव सांगून आपले मत कोणाला हे सांगणे बंधनकारक असणार आहे. यानंतर कुठल्या उमेदवाराला जास्त मते मिळतील तो विजेता घोषित करण्यात येईल, अशी माहिती नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांनी दिली. 

 
बातम्या आणखी आहेत...