आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वैद्यकीय शोध प्रबंधांचा आता ऑनलाइन स्वीकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर - डाॅक्टरकीत पदवी पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अंतिम वर्षात शोधप्रबंध (थेसिस) विद्यापीठात सादर करावा लागतो. त्याला २५ ते ३० हजार रुपये खर्च येतो. त्या खर्चाला फाटा देत आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंनी विद्यार्थ्यांचे थेसिस ऑनलाइन स्वीकारले जातील, अशी घोषणा केली. विद्यार्थ्यांनी एक कॉपी महाविद्यालयात जमा करावी. हार्ड कॉपी विद्यार्थ्यांना पोस्टाने घरपोच मिळेल, अशी माहिती कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.
आगामी काळात पीजीच्या जागाही ‘नीट’द्वारे भरणार
सर्वजागा ‘नीट’च्या मेरीटप्रमाणे भरण्यात येतात. सरकारी हस्तक्षेप आल्याने विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यास मदत झाली. आगामी काळात पीजीच्या जागाही ‘नीट’व्दारे भरल्या जातील. त्यानुसार वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू आहे. विद्यार्थी त्याच्या न्याय हक्कासाठी लढतात. त्यानुसार पद्धती दर्शवावी. कारण शासन एका विद्यार्थ्यांवर अभ्यासक्रमासाठी ते लाख रुपये खर्च करते. विद्यार्थ्यांनी याचा गंभीरपणे विचार करावा.

डिजिटल इंडियाची कास
देश डिजिटल इंडियाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यानुसार विद्यापीठाची वाटचाल होणे गरजेचे आहे. विद्यापीठाशी १७ शासकीय १४ खासगी महाविद्यालये संलग्न आहेत. त्यामध्ये पदवीचे साडेचार हजार तर पदव्युत्तरचे दीड हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थी हिताच्या दृष्टीने पुढील शैक्षणिक वर्षात ऑनलाइन थेसिस प्रमाणे पदवीचे प्रमाणपत्र ऑनलाइन देण्याची संकल्पना आहे.

डॉक्टरांनो शासकीय सेवेत या
शासकीय रुग्णालयात ऑर्थोपेडिक वा न्यूरोसर्जन पूर्णवेळ मिळत नाहीत. कारण शासकीय नोकरीपेक्षा या डॉक्टरांना बाहेर चांगला पैसा मिळतो. परंतु डॉक्टरांनी पैशाची तुलना समाजसेवेशी करू नये. कारण सेवा करण्याची तयारी मनापासून हवी. जास्तीत जास्त डॉक्टरांनी शासकीय सेवेमध्ये यावे.
बातम्या आणखी आहेत...