आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगालच्या विश्वमित्र कंपनीकडून सोलापुरात लाखोंची फसवणूक, 7 जणांवर गुन्हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
सोलापूर- सिद्धेश्वर पेठेतील कल्याणी टाॅवरमध्ये दोन वर्षांपूर्वी विश्वमित्र इंडिया कंपनी सुरू झाली. सुरुवातीला लोकांना पैसे गुंतवण्यास सांगून मोठी व्याज रक्कम देऊ, असे अामिष दाखवत अार्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल झाला अाहे. ही कंपनी मूळची पश्चिम बंगालची असून, सोलापुरातील अनेकांची लाखो रुपयाची फसवणूक झाल्याचे समोर अाले अाहे. 
 
इम्रान अब्दुल मजीद सय्यद (रा. बेगम पेठ) यांनी जेल रोड पोलिसांत सोमवारी तक्रार दिली अाहे. गुन्ह्याची व्याप्ती वाढणार असल्यामुळे हा तपास अार्थिक गुन्हे शाखेकडे अाला अाहे. अजम अबुबकर काझी, जियाउद्दीन शेख (रा. दोघे सोलापूर), मनोजकुमार चंद, एल. के. सिंग, रघुवीर प्रसाद त्रिपाठी, विकास शर्मा, सिद्धार्थ त्रिवेदी (रा. पश्चिम बंगाल) यांच्यावर गुन्हा दाखल झाला अाहे. अजय काझी हा सोलापूर शाखेचा मॅनेजर होता. ही कंपनी सोलापुरात ३१ मार्च २०१५ मध्ये अाली होती. विश्वमित्र इंडिया कंपनी अारएसएस ग्रामीण मायक्रो क्रेडिट कंपनीत पैसे गुंतवण्यास सांगून फसवणूक झाली अाहे. इम्रान सय्यद यांनी विश्वमित्र कंपनीत ४८ हजार तर ग्रामीण मायक्रो कंपनीत ९० हजार रुपये गुंतवले अाहेत. अजम काझीच दोन्ही कंपनीचा मॅनेजर होता. संशयित चंद, सिंग, त्रिपाठी, शर्मा, त्रिवेदी हे विश्वमित्र कंपनीशी संबंधित प्रमुख अाहेत. यांच्या कंपनीवर पश्चिम बंगाल, राजस्थान या भागात कारवाई झाल्याची प्राथमिक माहिती सोलापूर पोलिसांकडे असून, त्याची खातरजमा करण्यात येत अाहे. 
 
१९ गुन्ह्यांचा तपास 
अार्थिक गुन्हे शाखेत १९ गुन्ह्यांचा तपास सुरू अाहे. मागील गुन्ह्यांतील म्हणजे २३ प्रकरणांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात अाले अाहे. अनेक कोटींमध्ये फसवणूक झाली अाहे. 
 
नागरिकांनी तक्रार द्यावी 
विश्वमित्र इंडिया कंपनी ग्रामीण मायक्रो कंपनीत ज्या सभासदांनी पैसे गुंतवले अाहेत. तसेच फसवणूक झाली अाहे. अशा सभासदांनी अार्थिक गुन्हे शाखेत येऊन तक्रार देण्याचे अावाहन करण्यात अाले अाहे. मागील सहा-अाठ महिन्यांपासून कंपनी बंदच अाहे. 
 
गुन्ह्याची व्याप्ती वाढू शकते 
इम्रान सय्यद त्यांच्या परिवारातील सात जणांनी यात पैसे गुंतवले अाहेत. सध्या लाख ३८ हजार रुपयाची तक्रार अाली अाहे. गुन्ह्याची व्याप्ती वाढू शकते. पैसे किती गुंतवल्यावर किती देणार होते, याची काही लेखी नोंद अाहे. चौकशीत हा भाग समोर येईल. संशयितांच्या मागावर पोलिस असून, स्थानिक मॅनेजरला ताब्यात घेतल्यानंतर खरा प्रकार उजेडात येईल. अजम काझी यांच्यासह अन्य संचालक मंडळांनी ग्रामीण मायक्रो फायनान्स कंपनीत पैसे गुंतवण्यास सांगितले होते.
नितीन थेटे, सहायक पोलिस निरीक्षक अार्थिक गुन्हे शाखा 
बातम्या आणखी आहेत...