आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: ...अन्यथा एमआयएमने गाठला असता 15 नगरसेवकांचा आकडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिका निवडणुकीत एमआयएमने ३१ उमेदवार रिंगणात उतरवले होते. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी प्रचार काळात शेवटच्या टप्प्यात सोलापूरकडे लक्ष दिल्यामुळे केवळ जागांवरच समाधान मानावे लागले. मागील विधानसभा निवडणुकीतील मतकौल पाहता अाणखी चार ते पाच नगरसेवक निवडून अाले असते. पालिका निवडणुकीचा स्थानिक कार्यकर्त्यांना तितकसा अनुभव नसतानाही सोशल इंजिनअरिंग साधत दलित-अल्पसंख्यापक वर्गाचा मेळ घातला. हैदराबादी यंत्रणा काही बाबतीत यशस्वी झाली तर काही बाबतीत अयशस्वी झाली. 
 
प्रभाग क्रमांक २२ मध्ये एमआयएमचे उमेदवार जुबेर शेख यांचा ११३ मतांनी निसटता पराभव झाला. येथे सुरुवातीपासून एमआयएमची प्रचार यंत्रणा उत्तमोत्तम होती. मात्र जेव्हा या पक्षाने पदयात्रा काढली तेव्हा येथील उमेदवारांच्या ताकदीचा अंदाज प्रतिस्पर्ध्यांना आला आणि त्यांनी व्यूहरचना आखली. या व्युहरचनेत एमआयएमचे उमेदवार कमी पडले, तसेच पक्षश्रेष्ठींनी सुध्दा येथे विशेष लक्ष दिले नाही. प्रभाग क्रमांक १६ मध्ये गाझी जहागिरदार यांचा ९२, सलीम शेख यांचा ३४५, शिल्पा निकंबे यांचा १४४ मतांनी मतांनी पराभव झाला. येथे भाजप आणि दोन कॉँग्रेसचे उमेदवार निवडून आले.येथे आमदार इम्तीयाज जलील यांची सभा किंवा पदयात्रा झाली असती तर निश्चित फरक पडला असता. 

दलित आणि अल्पसंख्याकांमुळे बळ 
दलित आणि अल अल्पसंख्याक मतांमुळे पक्षाची ताकद वाढली होती. मात्र प्रचाराच्या नियोजना अभावी येथील उमेदवार निवडून आले नाहीत. प्रभाग क्रमांक १७ मध्ये ३३१ मतांनी अ. वाहिद नदाफ यांचा पराभव झाला. येथून नूतन गायकवाड निवडून आल्या. येथे प्रदेशाध्यक्ष मोईन सय्यद यांची सभा झाली. इतर पक्षांच्या मुस्लिम उमेदवारांमुळे मुस्लिम मतांची विभागणी झाली. मात्र भाजपप्रेमींची मते एक गठ्ठा पडल्यामुळे येथे भाजपच्या उमेदवारांचा विजय झाला. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...