आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘मंत्री असलो तरी ऊसदर जाहीर करू शकत नाही’; सहकारमंत्री सुभाष देशमुखांची हतबलता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर- ऊसदराचे अांदाेलन साेलापूर जिल्ह्यात चांगलेच पेटले अाहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावर टीका करत विविध शेतकरी संघटनांनी जिल्ह्यात अांदाेलनाचा जाेर वाढवला अाहे. या पार्श्वभूमीवर सहकार मंत्र्यांनी रविवारी हतबलता व्यक्त केली. ‘आपण राज्याचे सहकार मंत्री असलो तरी एकटा ऊसदर जाहीर करू शकत नाही. सर्व कारखानदारांसोबत चर्चा करून दर जाहीर करावा लागेल. मला मुद्दामहून यात टार्गेट केले जातेय. मी साखर कारखानदार म्हणून आलो नाही तर सरकारचा प्रतिनिधी म्हणून आपल्याकडे आलो आहे. सरकार एफआरपीपेक्षा जास्त दर देण्यास सांगू शकत नाही,’ अशी हतबलता देशमुखांनी अांदाेलकांसमाेर व्यक्त केली. विशेष म्हणजे देशमुख हे सुद्धा साेलापूर जिल्ह्यातील दाेन साखर कारखान्यांचे मालक अाहेत.  


पंढरपूर येथील बाजीराव विहिरीजवळ ऊसदरासाठी बेमुदत उपाेषणाला बसलेल्या अांदाेलक शेतकऱ्यांनी देशमुख यांनी रविवारी भेट घेऊन त्यांना अांदाेलन मागे घेण्याची विनंती केली. या वेळी उपोषणकर्त्यांची चर्चा करताना सहकारमंत्र्यांच्या प्रत्येक बोलण्यात त्यांची हतबलता दिसून येत होती. ‘मी जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना देखील फोन करून ऊसदराचा तोडगा काढण्यात पुढाकार घेण्याचे सांगितले होते. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनादेखील तशा सूचना केल्या होत्या.  मुख्यमंत्रीदेखील या प्रश्नावर लक्ष ठेवून आहेत. तरी आपण उपोषण स्थगित करावे दोन दिवसात ऊसदर जाहीर केले जातील,’ असे आश्वासन त्यांनी दिले. अखेर त्यांच्या विनंतीला मान देत आंदोलनकर्त्यांनी उपोषण स्थगित न करता केवळ औषधोपचार घेण्याची तयारी दर्शविली. दऱम्यान, पंढरपूर तालुक्यातील बहुतांश भागात रविवारी सकाळ पासून ऊसदराचे आंदोलन भडकलेले आहे. अनेक गावांत शेतकऱ्यांनी पेटते टायर रस्त्यावर फेकून वाहतूक बंद पाडली हाेती. 

 

बसवर दगडफेक 
माढा तालुक्यातील रिधोरे  येथील शेतकऱ्यांनी शनिवारी रात्री सव्वानऊ  वाजण्याच्या सुमारास उमरगा- बोरिवली  व बार्शीकडे जाणाऱ्या अाणखी एका बसवर दगडफेक केली. दाेन्ही बसमधील चालक, वाहक, प्रवाशांना खाली उतरवून अांदाेलकांनी बसच्या काचा फाेडल्या. तसेच शनिवारी रात्री ११ वाजता आर्डा पुलावर टायर पेटवून रास्ता राेकाे केला.   

बातम्या आणखी आहेत...