आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: विक्रीकर निरीक्षक पूर्वपरीक्षेची एक उत्तरपत्रिका गहाळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
सोलापूर - शहरातील २२ केंद्रांवर २९ जानेवारी रोजी विक्रीकर निरीक्षक पदासाठी पूर्वपरीक्षा घेण्यात आली होती. मात्र, यामध्ये एक उत्तरपत्रिका कमी मिळाल्याने याचा जिल्हाधिकारी कार्यालयाने खुलासा करावा, असे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात आले. याबाबत जिल्हाधिकारी यांनी संबंधित परीक्षा केंद्रावरील केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक, समवेक्षक यांना खुलासा करण्याबाबत नोटीस बजावली आहे. २०१५ मध्ये उत्तरपत्रिका गहाळ झाल्याने एकास आयोगाने शिक्षा दिली आहे.  

राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने २९ जानेवारी २०१७ रोजी विक्रीकर निरीक्षक पदासाठी पूर्वपरीक्षा होती. परीक्षेनंतर उत्तरपत्रिका आयोगाकडे पाठवण्यात आल्या. यात एक उत्तरपत्रिका कमी आली आहे. याबाबत चौकशी करून तातडीने अहवाल सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात आल्या आहेत. या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाने दयानंद काशिनाथ अासावा येथील परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक, समवेक्षक केंद्रप्रमुख यांना खुलासा करण्याची नोटीस बजावली आहे. 
बातम्या आणखी आहेत...