आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 लाख आत्महत्या, तरीही महाराष्ट्र का पेटत नाही? आमदार बच्चू कडू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुर्डुवाडी (ता. माढा) येथे जाहीर सभेत आमदार बच्चू कडू यांनी मार्गदर्शन केले. या वेळी शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते. - Divya Marathi
कुर्डुवाडी (ता. माढा) येथे जाहीर सभेत आमदार बच्चू कडू यांनी मार्गदर्शन केले. या वेळी शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते.
माढा / वैराग  - दारूपिल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, असे सांगून शेतकऱ्यांची बदनामी केली जात आहे. शेतकऱ्यांना कोणी वाली नाही. जातीय दंगलीने गावे पेटतात. परंतु चार लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊनही महाराष्ट्र का पेटत नाही, असा संतप्त सवाल आमदार बच्चू कडू यांनी केला. तसेच केंद्र राज्यातील नालायक सरकारला धडा शिकवण्यासाठी धर्मेंद्र जन्माला येण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. प्रहार शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ११ एप्रिलपासून काढलेल्या सीएम टू पीएम आसूड यात्रेचे शुक्रवारी जिल्ह्यात आगमन झाले. कुर्डुवाडी वैराग येथे याचे स्वागत करण्यात आले. यानंतर झालेल्या सभेत ते बाेलत होते. 
 
आमदार कडू यांनी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारवर टीका केली. ते म्हणाले, आसूड यात्रेत तरुणांनी सहभाग घेतल्यास पंतप्रधान मोदी यांनाही घाम फुटेल. जात, पंथ, धर्म यामुळे शेतकऱ्यांची लढाई मागे पडली आहे. गेल्या ६० वर्षांत शेतकऱ्यांनी अनेकदा आंदोलन केले. या काळात केंद्र राज्यात अनेकदा सत्तापालट झाले, तरीही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय झाले नाहीत. शेतकऱ्यांनी बँकेसह खासगी सावकाराचेही कर्ज घेतले आहे. त्याकडेेही सरकारने लक्ष द्यावे. अन्यथा आसूड ओढावा लागेल. मुख्यमंत्री फडणवीस आणखी किती आत्महत्यांची वाट पाहत आहेत. प्रास्ताविकात अतुल खुपसे यांनी सीना माढा बोगद्यातून कायमस्वरुपी २०० क्युसेक्सने पाणी सोडण्याची मागणी केली. याप्रसंगी बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील घाटणेकर, राज्य पोलिस पत्नी संघटनेच्या अध्यक्ष यशश्री पाटील, मीना पाटील, प्रमोद कुदळे, अतुल खुपसे उपस्थित होते. 
 
स्वामीनाथन आयोगाचे आश्वासन पाळले नाही 
माढा तालुक्तातील व्हळेसह २७ गावांच्या नळपाणीपुरवठा योजनेची वीज तोडल्याप्रश्नी मे महिन्यात आंदोलन करणार असल्याचे आमदार कडू यांनी सांगितले. दोन लाख १५ हजार कोटींच्या अर्थसंकल्पात १६ लाख कर्मचाऱ्यांसाठी एक लाख पाच हजार कोटींची तरतूद केली आहे. सातवा आयोगही लागू केला. त्यांनी मागण्या, आंदेलन करता त्याची पूर्तता झाली. यवतमाळ येथे पंतप्रधान मोदी यांनी स्वामीनाथ आयोगाविषयी दिलेली अाश्वासने पाळली नसल्याचही ते म्हणाले. 
 
पुढील स्लाईडवर वाचा, भट्टाचार्य, पटेल यांचे बोलवते धनी मोदीच... 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...