आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'निवृत्त न्यायाधीशांमार्फत कशाला, न्यायालयीन चौकशीलाही तयार'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - निवृत्त न्यायाधीशांमार्फत का? मी केलेल्या कामाची न्यायालयीन चौकशीसह सीबीआयमार्फत चौकशी करा, कोणत्याही प्रकारच्या चौकशीस मी तयार असल्याचे सांगत माझ्यावर आरोप करणाऱ्यांची नार्को चाचणी करण्यात यावी. त्यामुळे सत्य बाहेर येईलच. तसेच, कोणाचे हात कोठे आहेत हे समजून येईल, असे महापालिकेचे माजी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी सांगितले.

गुरुवारी मनपा उत्पन्न वाढीची बैठक झाली. यावेळी माजी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या कार्यकाळात झालेल्या कामाची चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्याचा निर्णय झाला होता. मनपा पदाधिकाऱ्यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावत कोणत्याही चौकशीला तयार असल्याचे 'दिव्य मराठी'शी बोलताना ते म्हणाले.

महापालिकेचे नेहमीच हित पाहिले
लोकसभाविधानसभा निवडणुकीपूर्वी हद्दवाढ भागात जलवाहिनीची अत्यावश्यक बाबीखाली कामे केली जावीत याकरिता काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दुसऱ्यांच्या फोनवरून फोन करून सूचना केल्या होत्या. ज्या भागात कामाची निकड होती त्या भागात कामे केली आहेत, असेही गुडेवार म्हणाले.

३५० कोटींची प्राॅपर्टी वाचवली
रेवणसिद्धेश्वरमंदिरसमोरील जागेचा वाद बऱ्याच काळापासून होता. ही जागा ताब्यात घेऊन महापालिकेची सुमारे ३५० कोटींचा प्राॅपर्टी वाचवली. तसेच तत्काळ सुरक्षा भिंत बांधून पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची काळजी घेतली. मनपाचे हित पाहून नेहमीच काम केल्याचे गुडेवार यांनी सांगितले.