आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खासगी बँकांचे काही एटीएम सुरू, सुटीमुळे बँकांत शांतता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रविवारी सुटी असल्याने सर्वच बँकांमध्ये शांतता होती. सुरू असलेल्या एटीएम केंद्रांवर तुरळक रांगा होत्या. पैसे संपल्याने लवकरच त्यांचे शटर्स आेढावे लागले होते. काही खासगी बँकांचे एटीएमही सुरू झाल्याने ग्राहकांना फारशी भटकंती करावी लागली नाही.
पाचशे आणि हजारच्या नाेटा रद्द केल्याची घोषणा नोव्हेंबरला रात्री झाली. त्यानंतर बँकांनी साप्ताहिक सुटी घेता आलेल्या ग्राहकांना नोटा बदलून दिल्या. खात्यावर जमा करून घेतले. तब्बल दहा दिवस बँकांवर प्रचंड ताण होता. रविवारी मात्र सर्व बँकांच्या परिसरात शुकशुकाट होता. सकाळच्या प्रहरी बँका सुरू असल्याची माहिती मिळाल्याने काही जण आले होते. परंतु सुरक्षा रक्षकांकडून बंद असल्याचा निरोप मिळताच, परतावे लागले. सोमवारी नेहमीप्रमाणे बँका चालू राहतील. नियमित वेळेत त्यांची सेवा राहणार असल्याचे सांगण्यात आले.

१. इथे मिळाली एटीएम सेवा : आयसीआयसीआय बँक (विजापूर रस्ता, बाळी वेस, महावीर चौक), स्टेट बँक ऑफ इंडिया (बाळीवेस, ट्रेझरी शाखा, अश्विनी रुग्णालय, भवानी पेठ, अशोक चौक, डफरीन चौक)
२.यांचे शटर्स अद्यापही बंद : रत्नाकर बँक, आयडीबीआय, बँक ऑफ इंडिया, काॅर्पोरेशन बँक, अॅक्सिस, इंडियन आेव्हरसीज, एचडीएफसी, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक, नॅशनल बँक, कॅनरा बँक, देना बँक, कोटक महिंद्रा.
३.बंदचे कारण कॅश नाही : ज्या बँकांचे एटीएम बंद होते, त्यांच्या शाखाधिकाऱ्यांना विचारले असता, नोटा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे आले. स्टेट बँकेने सर्व बँकांना चलन दिले. तरीही बँका चलन तुटवडा सांगतात.
४.पॉस सर्वांसाठी खुले : स्टेट बँक ऑफ इंडियाने पॉईंट ऑफ सेल (पॉस)ने गरजूंना पैसे देण्याचे नियोजन केले होते. अश्विनी रुग्णालय आणि मार्कंडेय रुग्णालयात ही सेवो होती. दुपारी बाळीवेस येथे सर्वांसाठी खुले केले.

रविवारीही लाख
^रविवार असतानाही ग्राहकांना पैसे देण्याचे प्रयत्न केले. ‘पॉस’ प्रणालीने रुग्णांना पैसे द्यायचे होते. परंतु डॉक्टर नसल्याने डिस्चार्ज नव्हते. अश्विनी रुग्णालयात २५ रुग्ण तर मार्कंडेय रुग्णालयात ४० रुग्णांना त्याचा लाभ दिला. त्यानंतर बाळीवेस शाखेत ते सर्वांसाठी खुले करून १७७ ग्राहकांना लाख रुपये वाटले.” सुहास गंडी, मुख्य व्यवस्थापक, एसबीआय
बातम्या आणखी आहेत...