आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंनिसचे जबाब दो, एसटीचा वेतन पुकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ज्येष्ठ समाजसुधारक डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यास शासनाला अपयश आले आहे. दुसरीकडे गोहत्या बंदीच्या नावाखाली निरपराध दलित अल्पसंख्याक लोकांवर अत्याचार केले जात आहेत. याचा शासनाला जाब विचारण्यासाठी पुरोगामी समविचारी संघटनांच्या वतीने २० जुलै ते २० ऑगस्ट या कालावधीत जबाब दो आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची सुरुवात गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आली. 
 
आंदोलनामध्ये अॅड. गाेविंद पाटील, कॉ. रवींद्र मोकाशी, व्ही.डी. गायकवाड, कुंडलिक मोरे, रा. गो. म्हेत्रस, शंकर जाधव, मधू जाधव, दत्ता गायकवाड, एम. आर. कांबळे, पूजा कांबळे, हसीब नदाफ, केशव इंगळे, मनीष गडदे, फारूक शेख, मतीन बागवान, दत्ता चव्हाण, हेमू चंदेले, यशवंत फडतरे, रूद्रप्पा बिराजदार, विष्णू गायकवाड, जयकुमार काटवे, कमल ढसाळ, प्रशांत गायकवाड, युसूफ शेख, नीता जाधव आदींचा सहभाग होता. 

डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे डॉ. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांची रेखाचित्रे राज्यातील सर्व पोलिस स्टेशन महत्त्वाच्या ठिकाणी लावण्यात यावीत, सारंग अकोलकर, प्रवीण निंबकर, रूद्र पाटील, जयप्रकाश हेगडे या सनातन संस्थेच्या फरार साधकांचे फोटो राज्यात महत्त्वाच्या ठिकाणी प्रसिद्ध करावेत, दाभोळकर, पानसरे यांच्या खुनाच्या घटनांच्या संशयित संघटनावर कायद्याच्या चौकटीत बसणारी कारवाई करावी, सनातन संस्थेच्या माध्यमातून मानसिक आजारावरची औषधे ही तीर्थ म्हणून साधकांना दिल्या जात असल्याची माहिती पुढे येत आहे, याची चौकशी करून कारवाई करावी, सन २०११ मध्ये सनातन संस्थेवर बंदीचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्यात आला होता, त्यावर तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री यांनी कोणतीही कारवाई केली नाही. संस्थेचा इतिहास पाहता राज्य शासनाने पुनर्विचार करण्यास केंद्र शासनास भाग पाडावे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...