आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसकडे पहिल्या दिवशी ३६ तर, 2 दुसऱ्या दिवशी अर्ज आले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिका निवडणुकासाठी कॉँग्रेस पक्षाने इच्छुकांची अर्ज स्वीकृती शनिवारपासून सुरू केली. पहिल्या दिवशी ३६ अर्ज आले तर रविवारी दुसऱ्या दिवशी फक्त दोनच अर्ज आले.
दोन्ही अर्ज प्रभाग क्रमांक मधील आहेत. सुवर्णा रूपनर आणि महिंद्र नकाते असे या दोन इच्छुकांची नावे आहेत. सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत वेळ देण्यात आली होती. पहिल्या दिवशीचा प्रतिसाद पाहता दुसऱ्या प्रतिसाद वाढेल असे वाटले हेाते. परंतु दुसऱ्या दिवशी फक्त दोनच अर्ज सादर करण्यात आले.

काँग्रेसतर्फे इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्ताने उमेदवारांना अर्ज विक्रीची सुरुवात केली. पहिल्याच दिवशी १०० इच्छुकांनी अर्ज घेतले. त्यामध्ये आजी-माजी नगरसेवकांसह युवतींचा सहभाग आहे.

महापालिकेवर काँग्रेसची सत्ता कायम ठेवण्यासाठी काँग्रेसने ‘व्हिजन ७५’ धोरण निश्चित केले. त्यासाठी पक्षातर्फे विविध उपक्रम, पदाधिकाऱ्यांचा बैठका सुरू आहेत. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने इच्छुक कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज विक्री स्वीकृतीचा शुभारंभ केला. त्यावेळी महापौर सुशीला आबुटे, आमदार प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष सुधीर खरटमल, महिला अध्यक्षा हेमा चिंचोळकर आदी उपस्थित होते.

आमदार शिंदे म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा बाहेर काढण्याच्या नावाखाली ५०० एक हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्या. त्यामुळे गोरगरिबांची आर्थिक स्थिती कोलमडली असून त्यांना रोजगार मिळत नाही. शे-पाचशे रुपयांसाठी लोकांना रस्त्यावर तासंतास उभे राहावे लागत आहे. मोदींच्या कारभाराबात लोकांमध्ये असलेली नाराजी, राज्यशासनाचा चुकीचा कारभार लोकांपर्यंत पोहचवा. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमदेवारांनी जनतेपर्यंत केंद्र राज्यशासनाची चुकीची धोरणं पोचवा.”

याप्रसंगी माजी सभापती विद्यमान नगरसेविका अश्विनी जाधव, अनुराधा सोनवणे, कृष्णवेली कोंडा, स्वाती कोठे, अनिल वाघमारे, नगरसेवक हारुण शेख, माजी नगरसेविका जयश्री शिंदे, उद्योजक अरुण शर्मा, श्रीकांत कोंडा, सोपना थोरात, मानसी हबीब, पूजा नल्लूवार, अलका साळुंके, चंदप्पा छत्री, बजरंग जाधव यांच्यासह अनेकांनी उमेदवारी अर्ज खरेदी केले. अर्जासाठी १०० रुपये शुल्क आहे.

शुल्क कपातीच्या हालचाली
इच्छुकउमेदवारांच्या शुल्कामध्ये गेल्या वेळच्या तुलनेत तब्बल दुप्पट वाढ करण्यात आली. खुल्या प्रवर्गासाठी १० हजार, महिला मागासवर्गीयांना पाच हजार रुपये शुल्क आहे. नोटांच्या तुटवड्यासह वाढीव शुल्काबाबत कार्यकर्त्यांमध्ये वेगवेगळी चर्चा सुरू आहे. त्यामुळे शुल्क कमी करण्याच्या हालचाली पक्षामध्ये सुरू आहेत.

काँग्रेसतर्फेडिसेंबरपर्यंत अर्जविक्री स्वीकृती करण्यात येणार आहे. सकाळी दहा ते दुपारी दीड दुपारी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत अर्ज विक्री करण्यात येईल. कार्यालयीन सचिव राजकुमार आयगोळे, सुधाकर क्षीरसागर, लतीफ मल्लाबादकर यांची नियुक्ती केली आहे.
-----------------
बातम्या आणखी आहेत...