आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर : राष्ट्रवादी काँग्रेस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातील वातावरण राष्ट्रवादी काँग्रेससाठी पोषक आहे. शहरातील २६ प्रभागात पूर्ण ताकदीने निवडणुका लढविल्यास नक्कीच जास्त जागा मिळतील. यामुळे येणारी महापालिका निवडणूक स्वबळावरच लढवावी, अशी आग्रही मागणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी बैठकीत केली आहे. यामुळे आगामी महापालिकेची निवडणूक स्वबळावरच लढविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची शहराध्यक्ष भारत जाधव यांनी दिली.
शहर कार्यालयात आगामी महापालिका निवडणुकीसंबंधी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती. बैठकीस माजी आमदार युन्नूस शेख, उपमहापौर प्रवीण डोंगरे, पद्माकर काळे, शंकर पाटील, मनोहर सपाटे, विठ्ठलसा चव्हण, जनार्दन कारमपुरी, परिवहन सभापती राजन जाधव, संतोष पवार, महिला शहराध्यक्ष अरुणा वर्मा आदी उपस्थित होते.

महापालिका निवडणुकीची तयारी म्हणून बोलाविण्यात आलेल्या बैठकीत स्वबळावर निवडणूक लढविण्यावर चर्चा केली. बैठकीतील निर्णय संपर्कप्रमुख अजित पवार यांना कळविण्यात येणार आहे. यामुळे स्वबळावर की काँग्रेससोबत आघाडी याचा अंतिम निर्णय अजित पवार घेणार आहे. मुलाखत प्रक्रिया, अर्ज विक्री लवकरच सुरू करण्यात येणार असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच प्रभागनिहाय निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष जाधव यांनी सांगितले.

जाहीरनामासमिती नेमली : निवडणुकीसाठीजाहीरनामा समिती नेमली. शंकर पाटील हे समन्वयक असून युन्नूस शेख, प्रवीण डोंगरे, जनार्दन कारमपुरी, दिलीप कोल्हे, मनोहर सपाटे, पद्माकर काळे सदस्य आहेत. येत्या १५ दिवसांत जाहीरनामा तयार करण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष जाधव यांनी सांगितले.

उमेदवारीसाठी लागणार हजार
शहर राष्ट्रवादी काँग्रेसने खुल्या जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारासाठी हजार तर राखीव जागेवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारास २५०० रुपये भरावे लागणार आहेत. अर्जाची किंमत १०० रुपये ठेवण्यात आली असून पक्षाच्या मासिकाची वार्षिक फी हजार क्रियाशील सभासद नोंदणी म्हणून हजार रुपये संबंधित निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारास भरावे लागणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...