सोलापूर- महापालिका निवडणूक निकालामध्ये सर्वच पक्षांच्या दिग्गज उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या आहेत. पराभूत ५४१ पैकी ३४१ उमेदवारांची अनामत जप्त झाली. यात उपमहापौर प्रवीण डोंगरे, माजी उपमहापौर हारून सय्यद, माजी महापौर नलिनी चंदेले, नगरसेवक लता फुटाणे, गीता मामड्याल, खैरूनिस्सा शेख, माशप्पा विटे, सारिका सुरवसे, नीला खांडेकर यांचा समावेश आहे. प्रभाग चारमध्ये सर्वाधिक २४ उमेदवारांची अनामत जप्त झाली. केवळ २०० उमेदवारांना अनामत वाचवणे शक्य झाले आहे.
प्रभाग मध्ये १९ उमेदवार : काँग्रेसचे प्रशांत कांबळे, शिवसेनेचे लता गादेकर, प्रभाकर काशिद आदी. प्रभाग मध्ये : शिवसेनेचे सुशांत इरकशेट्टी, अनुराधा चव्हाण आदी. प्रभाग मध्ये १० : राष्ट्रवादीचे नरसिंग येमूल, अपक्ष सुवर्णा हिरेमठ, अपक्ष सत्यनारायण अन्नलदास, अपक्ष वीरेंद्र िहंगमिरे, महादेव बिद्री, मनसेचे छोटेलाल व्यास आदी.
प्रभाग मध्ये सर्वाधिक २४ उमेदवार : काँग्रेसचे मीनाक्षी बंकापूर, महादेव अलकुंटे, संघमित्रा चौधरी, महेंद्र नकाते, बसपचे बबलू गायकवाड, अश्विनी गायकवाड, नितीन बंदपट्टे, राष्ट्रवादीच्या लता फुटाणे, जगदीश लिगाडे, शिवसेनेचे गौतम भांडेकर, सारिका साळुंके, पल्लवी कोळेकर आदी. प्रभाग मध्ये १९ : शिवसेनेचे ज्योती चव्हाण, सुभाष डांगे, रेखा कांचन, विष्ण्ू निकंबे, राष्ट्रवादीचे सुरेखा क्षीरसागर, आनंद भंवर, मनोज गादेकर, काँग्रेसचे चांगुणा शिंदे, दिगंबर ढेपे, कुणाल बाबरे आदी.
प्रभाग मध्ये १४ उमेदवार. प्रभाग मध्ये ११ : काँग्रेसच्या सविता बहिरवाडे, सुमन जाधव, गाेविंद कांबळे, राज सलगर, भाजपाचे अारूढ जाधव, वनिता मोटे, प्रियंका डाेंगरे, मनसेचे सुभाष माने, राजेश फडतरे आदी. प्रभाग मध्ये ११ तर प्रभाग मध्ये उमेदवार : उपमहापौर प्रवीण डोंगरे नगरसेविका गीता मामड्याल आदी. प्रभाग १० मध्ये ७. प्रभाग ११ मध्ये उमेदवार.
प्रभाग १२ मध्ये १० : काँग्रेसचे राजेंद्र कलंत्री, संजीवनी कुलकर्णी, एमआयएमचे नितीन गायकवाड, राष्ट्रवादीच्या कांताबाई बनसोडे आदी. प्रभाग १३ मध्ये २१, तर प्रभाग १४ मध्ये १८ उमेदवार. काँग्रेसचे मातब्बर मकबूल मोहोळकर तर राष्ट्रवादीचे खैरूनिस्सा शेख, मुदस्सर इनामदार आदी. प्रभाग १५ मध्ये ९, प्रभाग १६ मध्ये १८, प्रभाग १७ मध्ये ९,प्रभाग १८ मध्ये १२, प्रभाग १९ मध्ये ९, प्रभाग २० मध्ये जणांची अनामत जप्त झाली आहे.
प्रभाग २१ मध्ये एमआयएमच्या उमेदवारांनी इतर पक्षांच्या १५ जणांची अनामत जप्त करवली. यामध्ये काँग्रेसच्या माजी महापौर नलिनी चंदेले, माजी सभापती सारिका सुरवसे, सैफन शेख, राष्ट्रवादीच्या माजी उपमहापौर हारूण सय्यद, लता ढेरे, अपक्ष भीमाशंकर केंगनाळकर आदी. प्रभाग २२ मध्ये २४ उमेदवार. शिवसेनेच्या प्रिया चलवादी, काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका सरस्वती कासलोलकर, विनोद गायकवाड, अश्विनी जाधव आदी.
प्रभाग २३ मध्ये १०, प्रभाग २४ मध्ये १७, प्रभाग २५ मध्ये १४ उमेदवारांची अनामत जप्त झाली आहे. यामध्ये अपर्णा कोळी, विजयकुमार हत्तुरे, जितेंद्र पवार, दादाराव ताकमोगे यांचा समावेश आहे. प्रभाग २६ मध्ये १५ जणांची अनामत जप्त झाली आहे.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)