आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा 10 नगरसेवकांना रेड सिग्नल, शिवसेनेने निष्ठावंतांना डावलले, शेवटच्या दिवशी झुंबड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिका निवडणुकीसाठी शेवटच्या क्षणी उमेदवारांची धावपळ सुरू होती. पक्षांनीही शेवटच्या क्षणी उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने उमेदवारांची चांगलीच पंचाईत झाली. 
निवडणूक कार्यालय (नाॅर्थकोट प्रशाला) परिसरात सकाळपासून गर्दी होती. आॅनलाइन अर्ज भरून येणे सक्तीचे असल्याने साडेअकरानंतर उमेदवार येत होते. सकाळपासून शहराच्या विविध भागांतून मिरवणुकीने येऊन अर्ज दाखल करण्यात येत होते. शेवटच्या दिवशी २६ प्रभागांतून ९१३ जणांनी अर्ज दाखल केले. एकूण ११०४ जणांचे अर्ज दाखल झाले. 

एबीफार्म अधिकाऱ्यांकडे : शिवसेनेनेएबी फाॅर्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिले. भाजपने उमेदवारांना एबी फाॅर्म दिला. तीनपर्यंत निवडणूक कार्यालयात आलेल्यांचे अर्ज स्वीकारण्यात आले. टोकन देऊन सायंकाळी सहापर्यंत अर्ज भरून घेण्यात आले. 

नगरसेविकांचा राजीनामा : राष्ट्रवादी नगरसेविका सुनीता कारंडे, राजश्री कणके यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा देत भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केले. 

भाजप सरचिटणीसाबरोबर वाद : निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात प्रवेश देण्यावरून भाजपचे शहर सरचिटणीस हेमंत पिंगळे आणि पोलिस यांच्यात वाद झाला. सायंकाळी आलेल्या दीपक भंडारी यांना पोलिसांनी बाहेर काढले. 

सकाळी अर्ज दुपारी शस्त्रक्रिया : प्रभागक्रमांक सातमधून काँग्रेसकडून गाेविंद कांबळे यांनी जखमी अवस्थेत उमेदवारी अर्ज दाखल केला. सकाळी अर्ज दाखल केला तर दुपारी तीन वाजता त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. 

काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल, विश्वनाथ चाकोते, अॅड. यू. एन. बेरिया, महापौर सुशीला आबुटे, राष्ट्रवादीचे भारत जाधव, शिवसेनेचे महेश कोठे, रिपाइंचे राजा सरवदे निवडणूक कार्यालयात आले हाेते. भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी फिरकले नाहीत. 
 
भाजपचा १० नगरसेवकांना रेड सिग्नल, शिवसेनेने निष्ठावंतांना डावलले
 सोलापूर - भाजपच्या उमेदवार यादीत तब्बल ३७ आयारामांना संधी मिळाली. प्रचंड गटबाजीच्या राजकारणात सुरेश पाटील, नागेश वल्याळ, नरेंद्र काळे यांची अखेरच्या क्षणात वर्णी लागली. पालकमंत्र्यांचे पुत्र डॉ. किरण देशमुख यांची वर्णी लावण्यासाठी विद्यमान नगरसेवक चंद्रकांत रमणशेट्टी यांचा बळी द्यावा लागला. 
 
शिवसेनेतही असेच घडले. निष्ठावानांना डावलून काँग्रेसमधून आलेल्यांना संधी मिळाली. खुद्द महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अस्मिता गायकवाड, तात्या भंवर, लहू गायकवाड यांना डावलण्यात आले. काँग्रेसमधून आलेले काँग्रेसचे नगरसेवक विनायक कोंड्याल, सुभाष डांगे,
अमोल शिंदे यांना संधी देण्यात आली. 
 
भाजपची यादी निश्चित होण्यास विलंब लागला. सकाळी खासदार अॅड. शरद बनसोडे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची बैठक खासदारांच्या निवासस्थानी झाली. त्यानंतर सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि पालकमंत्री यांच्यात बैठक होऊन यादीबाबत हालचाली झाल्या. भाजपच्या यादीवर पक्षातील कार्यकर्त्यांपेक्षा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे शहर उत्तर, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे शहर दक्षिण मतदार संघात वर्चस्व दिसून आले. शेवटच्या क्षणापर्यंत यादी निश्चित होत नसल्याने कार्यकर्ते संभ्रमात होते. 
 
नगरसेवक नागेश वल्याळ यांना तीनऐवजी प्रभाग नऊमध्ये हलवण्यात आले. प्रभाग क्रमांक तीनमध्ये चन्नवीर चिट्टे यांच्यासाठी खासदार अॅड. शरद बनसोडे यांनी आग्रह धरला. तेथे सुरेश पाटील, संजय कोळी, अंबिका पाटील, नरेंद्र काळे यांना शेवटच्या क्षणी तिकीट देण्यात आले. काळे यांच्या उमेदवारीस सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी विरोध केला. पण पालकमंत्र्यांच्या प्रयत्नामुळे अखेरच्या क्षणी एबी फार्म देण्यात आला. 
 
रिपाइंचे गायकवाड यांना भाजपचे तिकीट : रिपाइंचेनगरसेवक रवी गायकवाडसह अजित गायकवाड यांच्या पत्नीस भाजपने उमेदवारी दिली. त्यामुळे तेथे माजी नगरसेवक रमेश व्हटकर यांनी शिवसेनेकडून अर्ज भरला. शिवसेनेतून आलेल्या राजश्री कणके यांना तिकीट दिले. प्रभाग क्रमांक एकमध्ये नगरसेवक अविनाश पाटील वगळता अन्य तीन उमेदवार दुसऱ्या पक्षातून आलेले आहेत. 

हिरेमठांनारडू कोसळले : कामकरून तिकीट मिळत नसेल तर काय उपयोग? आमच्या स्वभावाचा गैरफायदा घेत तिकीट कापले, असा आरोप करत नगरसेविका सुवर्णा हिरेमठ यांनी भावना व्यक्त केली. हे बोलत असताना त्यांना रडू कोसळले. 
 
यांना नाकारली उमेदवारी : भाजपमहिला अध्यक्ष इंदिरा कुडक्यालसह दहा नगरसेवकांना फेरउमेदवारी नाकारण्यात आली. यात चंद्रकांत रमणशेट्टी, कांता भोसले, सुवर्णा हिरेमठ, नरसूबाई गदवालकर, रोहिणी तडवळकर, पांडुरंग दिड्डी, कृष्णाहरी दुस्सा, सुरेखा अंजिखाने आदींचा समावेश आहे. 
 
राष्ट्रवादीकडून मागेल त्याला उमेदवारी, शोधाशोध : अर्ज भरण्यास दोन दिवस शिल्लक असेपर्यंत काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत चाललेल्या चर्चेमुळे राष्ट्रवादीला अखेरच्या दिवशी उमेदवार मिळवण्यासाठी अक्षरश: शोधाशोध करावी लागली. शुक्रवारी दुपारी वाजेपर्यंत पक्ष कार्यालयातून पक्षनिरीक्षक शहराध्यक्षांनी पक्ष कार्यालयातून मागेल त्याला एबी फॉर्मचे वाटप करीत होते. गुरुवारी ३३ जणांनी पहिली यादी जाहीर केली तर शुक्रवारी यादी जाहीर करता ३२ जणांना बी फार्म दिले. मात्र ३२ जणांची यादीच केली नाही. यामुळे नावे कळू शकली नाहीत. ६५ जागांवर उमेदवार दिल्याचे शहराध्यक्ष भारत जाधव यांनी सांगितले. शुक्रवारी मनोज गादेकर, आनंद झंवर, गीता पवार, पांडुरंग येलदे, गीता मामड्याल, रमेश पारपल्ली, मनीषा माने, मेघा पवार, मुदस्सर इनामदार, मेघना शिंदे, निला खांडेकर, राहुल इंदापुरे, दशरथ शेंडगे, युवराज राठोड, माजी महापौर अरुणा वाकसे यांच्यासह ३२ जणांनी अर्ज भरले. 

या नगरसेवकांना नाकारले... : नगरसेवकपीरअहमद शेख निर्मला जाधव यांनी मागणी करूनही त्यांना डावलण्यात आले तर सुनीता कारंडे यांना ऐनवेळी संधी दिल्याने त्यांनी भाजपातून उमेदवारी अर्ज दाखल केला. शांता दुधाळ, किशोर माडे यांनी उमेदवारीची मागणी केली नाही. स्वीकृत नगरसेवक दीपक राजगे यांनी पत्नीसाठी तर परिवहन सभापती राजन जाधव यांनी प्रभाग मधून उमेदवारी मागितली होती, त्यांनाही संधी दिली नाही. 

प्रभाग मध्ये विद्यमान उपमहापौर प्रवीण डोंगरे निवडणूक रिंगणात आहेत. मात्र याच प्रभागातील जागेवर यल्लादास पारपल्ली नारायण साखरे या दोघांना पक्षाने बी फॉर्म दिला आहे. यामुळे यातील पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण ? हे छाननीनंतरच स्पष्ट होईल. राष्ट्रवादी काँग्रेस ६, ७, १६, १७, २१, २३ २६ या प्रभागांतील सर्व जागा लढवत आहे. तर प्रभाग १९ मध्ये पक्षाला एकही उमेदवार मिळाला नाही. 

पाच मुस्लिम उमेदवार 
भाजपने रजिया शेख (प्रभाग १४), आरिफ शेख (प्रभाग १५), मोहसीन शेख (प्रभाग २०), बिलकीश सय्यद (प्रभाग २१), अॅड. रजाक शेख (प्रभाग २२) यांना उमेदवारी दिली. 

३७ उमेदवार आयात 
प्रभाग २४ मधून काळे किंवा चव्हाण तर प्रभाग दहामधून नावाबाबत संभ्रम आहे. राष्ट्रवादीच्या सुवर्णा कारंडे, काँग्रेसचे आरिफ शेख, रिपाइं रवी गायकवाड, शिवसेनेच्या राजश्री कणके या नगरसेवकांचा समावेश आहे. याशिवाय प्रा. नारायण बनसाेडे, विनायक विटकर, श्रीकांत घाडगे, अविनाश बोमड्याल, देवी झाडबुके, सुनील कामाटी, मीनाक्षी कंपली, वैभव हत्तुरे, अविनाश बेजरपे, सचिन सोनटक्के, लक्ष्मी नडगिरे, चंद्रकला गायकवाड, मनीषा हुच्चे, मधुसूदन जंगम आदींचा समावेश आहे. 

आज सकाळी ११ पासून छाननी 
सर्व अर्जांवर शनिवारी सकाळी ११ ते छाननी संपेपर्यंत प्रक्रिया चालणार आहे. छाननीसाठी फक्त उमेदवारांनी सकाळी १०.३० वाजता होम मैदानाकडील यादी गेटने प्रवेश करावा. गरज पडल्यास उमेदवार वकिलांना बोलावून घेऊ शकतील. पक्षाचे नाव आहे. पण एबी फॉर्म नसेल तर ते अपक्ष म्हणून पात्र राहतील. 

विविध वेशात मिरवणूक आणि अर्ज 
शिवसेनेचे देवेंद्र काेठे, अमोल शिंदे यांनी शक्तिप्रदर्शन करत मिरवणूक काढली. काँग्रेसचे चेतन नरोटे, विनोद भोसले यांनी प्रभागातील नागरिकांसह येऊन अर्ज दाखल केले. तसेच फिरदोस पटेल यांनी ढोल पथकासह मिरवणूक काढली. राष्ट्रवादीचे दिलीप कोल्हे मिरवणुकीत वासुदेवाचा वेशातील नागरिकांसमावेश होते. काँग्रेसचे राज सलगर यांनी बाराबंदीत येऊन अर्ज दाखल केला. भाजप गणवेश घालून आलेले इच्छुक तिकीट नाकारल्याने नाराज होत बाहेर पडत होते. 

शिवसेनेच्या पाच जागा रिकाम्या  
१.शिवसेनेच्या या यादीत एकूण ९७ उमेदवार आहेत. पाच ठिकाणी त्यांनी उमेदवारच मिळाले नाहीत. या पाचही जागा महिलांच्या आहेत. ते असे : ब, क, १४ ब, १९ आणि २१ मध्ये महिला नाहीत. 
२.कोठे यांच्याच घरातील एकूण जणांना संधी देण्यात आली. त्यात महेश कोठे, देवेंद्र कोठे, प्रथमेश कोठे यांचा समावेश आहे. जावई विनायक कोंड्याल हे काँग्रेसमधून सेनेत आल्याने त्यांनाही संधी मिळाली. 
३.प्रभाग क्रमांक मध्ये शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक तात्या भंवर यांना डावलून काँग्रेसमधून
आलेले सुभाष डांगे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे भंवर संतप्त होते. 
 
पुढील स्लाईडवर पाहा, शेवटच्या दिवशी उडालेली झुंबड...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
बातम्या आणखी आहेत...