आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदाराने चारपेक्षा कमी मते दिल्यास उर्वरित मते ‘नोटा’कडे वळवली जाणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मतदान करण्याचे प्रात्यक्षिक - Divya Marathi
मतदान करण्याचे प्रात्यक्षिक
सोलापूर - महापालिका निवडणुकीसाठी एक ते २४ प्रभागांसाठी चार तर २५ आणि २६ प्रभागांसाठी तीन मते मतदारांना देता येतील. मतदाराने चारपेक्षा कमी मते दिली तर मतदान केंद्राध्यक्ष उर्वरित मते नोटास (यापैकी नाही) देतील. एका मशीनवर एक किंवा दोन गटाचे मतदान असेल, अशी माहिती महापालिका मुख्य निवडणूक अधिकारी विजयकुमार काळम यांनी दिली. 

मतदान करण्याबाबत प्रात्यक्षिक शुक्रवारी झाले. महापालिका निवडणुकीसाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. त्यासाठी मतदान मशिनवर मतपत्रिका लावण्याचे काम पूर्ण झाले. सोमवारी यंत्र मतदान केंद्राकडे पाठवण्यात येणार आहे. 

एका मतदारास चार मतदान करण्याचा अधिकार आहे. एका मतपत्रिकेवर दोन मतदान करता येणार नाही आणि ते स्वीकारलेही जाणार नाही. दोन ते तीन मतदान केल्यावर पुढे मतदान करण्याची इच्छा नसेल तर मतदान केंद्राध्यक्ष मतदान प्रतिनिधीसमोर ‘नोटा’स मतदान करतील. त्यावेळी इतर मतपत्रिका दिसणार नाही याची काळजी घेण्यात येईल. चार मतदान झाल्यावर प्रक्रिया पूर्ण झाल्याची नोंद होत आवाज येणार आहे. मतदार कमीत कमी मतदान केल्यास अन्य मत नाेटास देत ती प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे यंदा ‘नोटा’ला मतदान वाढण्याची शक्यता आहे. 

मतदानाचे प्रात्यक्षिक 
मतदान यंत्राच्या अाधारे महापालिका निवडणूक अधिकारी विजयकुमार काळम यांनी शुक्रवारी प्रात्यक्षिक दाखवले आणि शंका समाधान केले. या वेळी मनपा निवडणूक विभाग प्रमुख श्रीकांत म्याकलवार, निवडणूक निर्णय अधिकारी विद्युत वरखेडकर, प्रभारी नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, नगर रचना अधिकारी महेश क्षीरसागर, बागेवाडीकर, सुधा साळुंके आदी उपस्थित होते. 
 
पुढील स्लाईडवर वाचा, एका पक्षाचा एकच प्रतिनिधी...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...