आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: भाजप, शिवसेना, एमआयएमची महापालिकेत ‘दंगल’, भाजपचाच फडकला झेंडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- महापालिका निवडणुकीत शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांवर भारतीय जनता पक्षाचा वरचष्मा राहिला आहे. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि एमआयएमने जोरदार मुसंडी मारली आहे. शहर उत्तरमध्ये काँग्रेसचा पूर्णपणे सफाया झाला आहे.

महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी सर्वच राजकीय पक्षांतर्फे सुरू होती. आमदार शिंदे यांच्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील एकूण ३६ नगरसेवकांपैकी तब्बल १७ जागांवर भाजपला विजय मिळाला आहे. एमआयएम आणि काँग्रेसचे प्रत्येकी आठ नगरसेवक विजयी झाले. पूर्वी माकपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघातून फक्त एक माकप उमदेवार विजयी झाला.

भाजपचा बालेकिल्ला अशी आेळख असलेल्या शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा पूर्णत: सफाया झाला असून, एकही उमदेवार निवडणूक आला नाही. शहर उत्तरमध्ये भाजपचे तब्बल २४ उमेदवार विजयी झाले. तर शिवसेनेचे १७ उमेदवार विजयी झाले असून, बसपचे चार नगरसेवक आहेत. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्व कौशल्याचा विजय झाला आहे. 

सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक १२ भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक विजयी झाले. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासाठी येथील निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. येथे काँग्रेसचे फक्त सहा नगरसेवक विजयी झाले असून, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे चार, शिवसेना तीन व एमआयएम या पक्षाच्या तीन नगरसेवकांनी विजय मिळवला आहे.
 
पुढील स्लाईडवर वाचा, पूर्ण 26 प्रभांगामधील विजयी उमेदवार आणि आकडेवारी...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...