आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: निवडणुकीच्या व्यापात पालिकेचे बजेट विसरले, 20 फेब्रुवारी मुदत असताना अद्याप सादर नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिका निवडणुकीच्या कामाच्या व्यापात महापालिका प्रशासनाने अंदाजपत्रक तयार करून स्थायी समितीकडे सादर केले नाही. प्रशासनाकडून अंदाजपत्रक सादर करण्याची मुदत २० फेब्रुवारीपर्यंत असते. परंतु ते अद्याप सादर केले नाही. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात स्थायी समितीपुढे विषय घेऊन त्यावर चर्चा करून दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात मनपा सभागृहाकडे शिफारस करणे आवश्यक असते. त्यानंतर ३० मार्च रोजी अंदाजपत्रक सभा बोलावून त्यावर चर्चा करून निर्णय घेतले जातात. 
 
यंदा अंदाजपत्रकासंदर्भात मनपा प्रशासनाने अद्याप बैठकच घेतली नाही. सर्व विभागांकडून आकडेवारी मागवून त्यावर चर्चा करून सादर करणे आवश्यक होते. नवे महापौर निवड मार्च रोजी आहे. त्यानंतरच्या आठवड्यात स्थायी समिती सभापती निवड होईल आणि त्यानंतर स्थायी समितीत अंदाजपत्रक मांडून सभागृहाकडे पाठवण्यात येणार आहे. 

महापालिका अंदाजपत्रक तयार आहे. आयुक्तांमार्फत स्थायी समितीकडे सादर करू, असे महापालिका मुख्य लेखापाल दत्तात्रय लोंढे यांनी म्हटले आहे. 

भाजपचे पहिलेच अंदाजपत्रक 
महापालिका निवडणुकीनंतर पहिले काम अंदाजपत्रक तयार करण्याचे आहे. महापालिकेत भाजपची सत्ता स्थापन होणार असली तरी अंदाजपत्रक तयार करणे एक आव्हान असणार आहे. निवडणुकीत वचननामा जाहीर केल्यानंतर त्यानुसार बजेटमध्ये काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. महापालिका तिजोरीत खडखडाट असताना अंदाजपत्रक सादर करणे आव्हानाचे काम असणार आहे. 

३६२ कोटींचे नूतनीकरण प्रस्ताव 
सन २०१५-१६ चे हिशेब शिल्लक रकमेचे नूतनीकरण प्रस्ताव प्रशासनाने स्थायीसमोर ठेवले आहे. ३६२ कोटी ९६ लाख पाच हजार ३०१ रुपयांचा नूतनीकरण प्रस्ताव आहे.
बातम्या आणखी आहेत...