आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: शहर निवडणार आज आपल्या पालिकेचे कारभारी, एकूण 102 जागा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहर मंगळवारी आपले ‘म्युन्सिपल’ प्रतिनिधी निवडणार आहे. एकूण १०२ जागांसाठी ६२३ उमेदवार रिंगणात असून, ८९६ केंद्रांवर मतदान होणार आहे. सुमारे सहा लाख ७३ हजार मतदार आपला हक्क बजावतील. 
 
सकाळी साडेसातला सुरुवात होईल. सायंकाळी साडेपाचला शेवट होईल. मतदान सुरू झाल्यानंतर दर दोन तासाला मतदानाची आकडेवारी जारी होईल. सर्व नागरिकांनी मतदान करावे, असे आवाहन महापालिका निवडणूक निर्णय अधिकारी विजयकुमार काळम यांनी केले आहे. 
मतदान केंद्र माहिती स्लीप मिळाली नसली तरी केंद्रावर माहिती मिळेल. तेथे नाव नसेल तर केंद्राच्या १०० मीटर अंतराबाहेर मनपाचे कर्मचारी मदतीसाठी असतील. ते नाव शोधून देतील. मतदानांची टक्केवारी वाढवावी, असे आवाहन काळम यांनी कर्मचाऱ्यांना केले आहे. 

नाव १० सेकंदात 
मतदारयादीतील नाव केंद्राची माहिती नसेल तर नाव १० सेकंदात शोधता येईल. त्यासाठी गुगलमध्ये जाऊन smcvotersearch.org या संकेतस्थळावर जाऊन नावात आपले पूर्ण नाव टाकल्यास १० सेकंदात मतदान केंद्र पत्ता, प्रभाग क्रमांक आणि मतदान अनुक्रमांक मिळेल. हे संकेतस्थळ महापालिकेने अधिकृतपणे घेतले आहे. 

मागच्या वेळी ४८ टक्के मतदान 
सन २०१२ च्या महापालिका निवडणुकीत शहरात सरासरी ४८ टक्के मतदान झाले होते. मतदान केंद्रावर सर्वात जास्त ५५ तर सर्वात कमी ३५ टक्के मतदान झाले होते. यंदा यात वाढ होऊन सरासरी ६० टक्क्यांपेक्षा जास्त होईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...