आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: मतदान केंद्रावर एकच प्रवासी वाहन तिसऱ्यांदा अाल्यास होणार जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होत अाहे. मतदारांना बूथवर घेऊन येणाऱ्या प्रवासी वाहनांवर वाहतूक पोलिसांचे लक्ष राहणार अाहे. कारण एकच वाहन तिसऱ्यांदा मतदान केंद्रावर आल्यास ते जप्त करण्यात येईल, असा इशारा पोलिस अायुक्त रवींद्र सेनगावकर यांनी दिला अाहे.
 
यासाठी खास पथके नेमण्यात अाली अाहेत. अवैध मतदार वाहतूक रोखण्यासाठी ही उपाययोजना पोलिसांनी यंदा प्रथमच केली अाहे. याबाबत वाहतूक शाखेचे सहायक पोलिस अायुक्त डाॅ. प्रशांत अमृतकर यांना विचारले असता ते म्हणाले, एकच वाहन, एकाच मतदान केंद्रावर येत असल्यास (दोन पेक्षा जास्त वेळा) त्याची चौकशी होईल. त्यातील प्रवासी खासगी अाहेत का, एकाच कुटुंबातील अाहेत, याचीही खातरजमा होईल. कुठला तरी उमेदवार नागरिकांना ने-अाण करण्यासाठी खासगी वाहनांचा वापर करतोय, असे चौकशीत समोर अाल्यानंतर ते वाहन जप्त करण्यात येईल. शंभर मीटर सीमारेषेवर एक फौजदार, पोलिस, होमगार्ड असा बंदोबस्त दिला अाहे. अालेल्या वाहनांचे नंबर पोलिस टिपतील. 

मतदान केंद्र शोधण्यासाठी निवडणूक आयोगाचे अॅप 
राज्यनिवडणूक आयोगाने मतदारांच्या सोयीसाठी नुकतीच ‘ट्रू वोटर’अॅप तयार केले आहे. याद्वारे मतदारयादीतील नाव, बूथ क्रमांक अनुक्रमांक सहज शोधता येईल. मतदानाच्या दिवशी होणारी धावपळ यामुळे होणार नाही. अॅण्ड्राॅईड मोबाइलच्या प्ले स्टोअर वरून अॅप डाऊनलोड करता येईल. अॅपवर सर्च ऑप्शन येईल. त्यात नाव शोधता येईल. त्यासाठी महापालिका, मतदारसंघ आणि नाव आडनाव याची माहिती क्रमाने द्यावी लागणार आहे. त्यानंतर मतदान केंद्र आदी माहिती दिसेल. ही माहिती ‘स्क्रीन शॉट’ ऑपश्नने फोटो काढून कायमस्वरुपी आपल्याकडे ठेवता येईल. 
 
बातम्या आणखी आहेत...