आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वंदे मातरमच्या वेळी ध्वनिक्षेपक बंद; तिघांवर कारवाईचे आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेची सभेच्या सुरुवातीला राष्ट्रगीत, वंदे मातरम सुरू असताना ध्वनिक्षेपक बंद पडला तसेच सभेत तातडीच्या विषयांचे वाचन सुरू असताना आवाज येत नसल्याने गोंधळ उडाला. या प्रकरणी विद्युत विभाग प्रमुखासह तिघांवर कारवाई करण्याचे आदेश महापौर शोभा बनशेट्टी यांनी दिले. 
 
महापालिकेची जुलै महिन्याची सभा गुरुवारी महापौर शोभा बनशेट्टी यांनी बोलावली होती. मूळचे सोलापूरचे आणि म्हाडाचे अध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांचा मुलगा मन्मथ यांचे निधन, तसेच अमरनाथ हल्ल्यात मृत भाविकांना श्रद्धांजली अर्पण करून सभा तहकूब करण्यात आली. तत्पूर्वी सभेच्या सुरुवातीला वंदे मातरम सुरू असताना ध्वनिक्षेपक बंद पडला. शिवाय तातडीच्या विषयाचे वाचन करत असताना आवाज येत नव्हता. दरम्यान नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. याप्रकरणी विद्युत विभागाचे प्रमुख राजेश परदेशी यांची एक वेतनश्रेणी थांबविणे, साळंुके नावाच्या कर्मचाऱ्याचे निलंबन आणि मानधनावरील शेख यांना कामावर कमी करण्याचे आदेश महापौर बनशेट्टी यांनी दिले. 
आजच्या सभेत मनपा प्रशासनाकडून परिवहनला पाच कोटीचे अनुदान देणे आणि शहरातील एक ते आठ झोन कार्यालय अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी १.२८ कोटी तरतूद करणे हे तातडीचे विषय होते. 
 
बातम्या आणखी आहेत...