आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन् अंत्ययात्रेसाठी मुस्लिम बांधवांनी केली वाट माेकळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - दिलीप ब्राम्हणेमुस्लिम बांधवांनी मात्र मानवतेचा परिचय देत एकतेचे दर्शन घडवले. शहरातील एका मार्गावर भव्य ईद-ए- मिलादच्या भव्य मिरवणुकीने रस्ता गच्च भरलेला असताना हिंदू बांधवांच्या अंत्ययात्रेसाठी मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेत वाट मोकळी करून दिली. विशेष म्हणजे ढोलताशेही काही काळ बंद ठेवले.
ईद-ए-मिलादनिमित्त मुस्लिम बांधव दरवर्षीच मोहम्मद अली रोडवरून भव्य मिरवणूक काढतात. यंदाही सोमवारी सकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यादरम्यान अकोट स्टँडजवळ असलेल्या एका हिंदू बांधवांच्या घरी मयत झाली. त्यांच्या दु:खाला पारावार उरला नसताना रस्त्यावरून भव्य मिरवणुकीनिमित्त गर्दी असताना आता माळीपुऱ्याकडे अंत्ययात्रा कशी न्यायची असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला.

मात्र, त्यांची घालमेल पाहता पोलिस प्रशासन त्यांच्या मदतीला धावून गेले. तसेच मुस्लिम बांधवांनीसुद्धा मानवतेचा परिचय देत ढोलताशे काहीवेळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला अंत्ययात्रेला वाट मोकळी करून देण्याची ग्वाही दिली. जशी अंत्ययात्रा अकोट स्टँडकडून माळीपुऱ्याकडे जायला लागली तशीच मुस्लीम युवकांनी स्वयंसेवकाची भूमिका निभावत पोलिसांना सहकार्य करत अंत्ययात्रेला वाट मोकळी करून दिली. वाटच मोकळी करून दिली नाही तर ढोलताशेही काहीवेळ बंद ठेवून माणुसकीचा परिचय दिला.
सावंत शिवनाथ बाबर हे आपल्या गावी वडगाव येथे जात असतांना तेथे हा युवक गंभीर अवस्थेत पडलेला दिसला होता. लगेच पथक प्रमुख दीपक सदाफळे यांना अरविंद सावंत यांनी फोनवरुन तात्काळ माहीती दिली. आदेश येताच त्या युवकाला तात्काळ २० मिनीटात अकोला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी गाडी नंबरवरून चौकशी केली असता जखमी युवक हा येळवण येथील रुपेश सुभाषराव गावंडे येथील असल्याचे समजले.
पोलिसांची महत्त्वाची भूमिका : जिल्हापोलिस अधीक्षक चंद्र किशोर मिणा अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या कानावर ही माहिती पोलिस निरीक्षक अन्वर शेख यांच्याकडून टाकण्यात आली. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पोलिसांना सूचना दिल्या अंत्ययात्रेला कुठलीही बाधा पोहचवता मार्ग मोकळा करून देण्याच्या सूचना दिल्या. त्याची अंमलबजावणी करत उपविभागीय पोलिस अधिकारी उमेश माने पाटील यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक अन्वर शेख, सहायक पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांनी अंत्ययात्रेला मोकळी वाट करून दिली.
बातम्या आणखी आहेत...