आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\"मूलभूत\'साठी चाळीस कोटींच्या निधीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- मूलभूत सुविधांच्या ४० कोटींच्या प्रस्तावाच्या स्थगितीबाबत मुख्यमंत्र्यांना भेटून सत्य परिस्थिती निदर्शनास आणून देणार अाहे. विरोधकांनी राज्यातील सत्तेचा फायदा घेण्याऐवजी गैरफायदा घेत ४० कोटींच्या कामांना स्थगिती मिळवली. शहराच्या विविध भागातील मूलभूत सुविधांचा प्रश्न या निधीतून मार्गी लागणार होता. परंतु विरोधकांनी सुडाचे राजकारण करत जनतेला वेठीस धरले, असा आरोप आमदार संग्राम जगताप महापौर अभिषेक कळमकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.

मूलभूत सुविधांच्या ४० कोटींच्या प्रस्तावाच्या मंजुरीचे गुुऱ्हाळ अद्याप सुरूच आहे. विभागीय आयुक्तांनी प्रस्तावास मंजुरी दिल्यानंतर प्रस्तावातील काही कामांच्या निविदाही प्रसिध्द करण्यात आल्या. परंतु काही विरोधकांनी शासनाकडे तक्रार करून प्रस्तावास स्थगिती मिळवली. महापालिका प्रशासनाला स्थगितीबाबतचे पत्र शुक्रवारी मिळाले. शहरातील रस्त्याच्या कामांपेक्षा शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेला (फेज टू) प्राधान्य देण्यात यावे, त्यानंतरच रस्त्यांची कामे सुरू करावी, असे पत्रात म्हटले आहे. राज्य शासनाचे मुख्य सचिव विवेक कुंभार यांनी हे पत्र दिले आहे. दरम्यान, शासनाच्या या चुकीच्या निर्णयाविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागणार आहे. मुख्यमंत्र्यांना भेटून सत्य परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात येणार असल्याची माहिती आमदार जगताप महापौर कळमकर यांनी दिली. यावेळी दोघांनीही विरोधकांच्या या भूमिकेवर टीका केली. अामदार जगताप म्हणाले, विभागीय आयुक्तांनी सर्व बाबींची तपासणी करूनच ४० कोटींच्या प्रस्तावास मंजुरी दिली होती. विशेष म्हणजे या प्रस्तावात विराेधकांच्या प्रभागातील देखील कामे आहेत.
प्रस्तावात कामांचा समावेश करताना कोणताही भेदाभेद करण्यात आलेला नाही. सर्वांना समान न्याय देण्यात आला अाहे. विराेधकांनी राज्यातील सत्तेचा वापर चांगल्या कामांसाठी करावा, शहरासाठी जास्तीत जास्त निधी मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. परंतु काही विरोधक चांगल्या कामात खोडा घालण्याचे काम करत आहेत. सत्तेचा फायदा घेण्याऐवजी ते गैरफायदा घेत आहेत. त्याचा त्रास मात्र नगरकरांना सहन करावा लागत आहे. शहराच्या विविध भागातील रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेज, गटार, लाईट असे विविध मूलभूत प्रश्न ४० कोटींच्या निधीतून मार्गी लागणार होते. परंतु विरोधकांच्या आडमुठ्या धोरणामुळे आता ही कामे लांबणीवर पडणार असल्याचे जगताप यांनी सांिगतले. यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून सत्य परिस्थिती त्यांच्यासमोर ठेवणार असल्याचे जगताप यांनी सांिगतले.

दिशाभूल करून मिळवली स्थगिती
शहरसुधारितपाणीपुरठा योजनेचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येणार आहे. मुलभूत सुविधांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामामुळे पाणी योजनेच्या कामात अडथळा येणार नाही. जेथे रस्त्याचे काम करायचे, तेथे अगोदरच पाणी योजनेची लाइन टाकण्यात येणार आहे. परंतु असे असतानाही विरोधकांनी सुडाचे राजकारण करत शासनाची दिशाभूल करून ४० कोटींच्या निधीला स्थगिती मिळवली.'' अभिषेक कळमकर, महापौर

५० टक्क्यांपेक्षा अधिक कामे विरोधकांच्या प्रभागांतील
"मूलभूत'च्या ४० कोटींच्या प्रस्तावात अनेक विरोधी नगरसेवकांच्या प्रभागातील कामांचा समावेश आहे. परंतु काही ठराविक विरोधकांच्या तक्रारीमुळे या निधीला स्थगिती देण्यात आली. त्याचा फटका विरोधकांनाही बसणार आहे. प्रस्तावात ५० टक्क्यांपेक्षा अधिक कामे विरोधकांची आहेत. विभागीय आयुक्तांनी सर्व बाबींची तपासणी करूनच हा निधी मंजूर केला होता, असे महापौर कळमकर यांनी स्पष्ट केले.

संपूर्ण शहराला बसला फटका
^शहरासाठीमिळालेल्या४० कोटींच्या निधीला स्थगिती आणून विरोधकांनी मोठे पाप केले आहे. महापालिकेत युतीची सत्ता असतानाही तत्कालीन आघाडी सरकारने महापालिकेला हा निधी दिला होता. परंतु आताच्या राज्य सरकारने मात्र नागरिकांच्या िहताचा विचार करता केवळ सूडबुध्दीचे राजकारण करत या निधीला स्थगिती दिली. विरोधकांच्या या चुकीच्या भूमिकेचा संपूर्ण शहराला फटका बसणार आहे.'' सविता कराळे, नगरसेविका.