आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकाश सणाचा लखलखाट; आज नरक चतुर्दशी, आयुर्वेदिक रुग्णालयांमध्ये धन्वंतरीची पूजा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दीपोत्सव म्हणजे प्रकाशाचा सण. लक्ष-लक्ष दिव्यांनी आसमंत उजळून निघाला. बाजारपेठांमध्ये नुसता लखलखाट दिसत आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण पसरले. मंगळवारी धनत्रयोदशीला सराफपेढ्यांना सुवर्ण झळाळी होती. आयुर्वेद उपचार करणारी मंडळी धन्वंतरीच्या पूजेत मग्न होती. आकाशकंदिलाच्या प्रकाशात सुंदर रंगावली काढून पणत्या लावण्यात आल्या होत्या. मंद आवाजात गाणे होते - आली माझ्या घरी ही दिवाळी... 
 
धन्वंतरी पूजा : शेठसखाराम नेमचंद रुग्णालयात मंगळवारी सायंकाळी धन्वंतरी पूजा झाली. संस्थेचे अध्यक्ष अरविंद दोशी आणि डॉ. प्रतिभा दोशी यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. या वेळी प्रिया जदेरिया, चंद्रनील जदेरिया, चंद्रमोहन शहा, संस्था सचिव डॉ. प्रदीप कोठाडिया, विश्वस्त आदर्श मेहता, प्राचार्य डॉ. अनिल माने, प्रशासकीय अधिकारी अनुप दोशी, डॉ. रावसाहेब पाटील आदी होते. 
 
आज नरक चतुर्दशी : बुधवारी नरकचतुर्दशी निमित्त अभ्यंगस्नासाठी सुगंधी तेल, आयुर्वेदिक उटणे खरेदीची बाजारपेठेत लगबग होती. मिठाईसह, विविध वस्तूंच्या खरेदीसाठी मध्यवर्ती बाजारपेठेत गर्दी होती. दुकानांमध्ये वेगवेगळ्या प्रकारातील आकाशदिव्यांनी दुकाने सजली होती. पारंपरिक अष्टकोनी खालच्या बाजूस झुरमुळ्या असणाऱ्या दिव्यांना ग्राहकांची विशेष मागणी होती. 
 
मावळे खरेदीसाठी : कार्यालयांबरोबरघरामध्ये लावण्यासाठी छोटे आकाशदिवे विक्रीसाठी उपलब्ध होते. चिमुकल्यांनी तयार केलेल्या किल्ल्यांची सजावट, मावळे खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी होती. घर परिसरात आकर्षक रांगोळी काढण्यासाठी महिला युवतींची मधला मारुती परिसरात विविध रंगांच्या रांगोळी खरेदीसाठी लगबग सुरू होती. 
 
बाजार पेठेत गर्दी : यंदाही दसरा झाल्यानंतर लगेच दिवाळीच्या तयारीला सुरुवात झाली होती. घरोघरी स्वच्छता, रोषणाईची व्यवस्था केली जात आहे. 
बातम्या आणखी आहेत...